घरफिचर्सवैचारिक मूल्यांचा पाया!

वैचारिक मूल्यांचा पाया!

Subscribe

थिएटर ऑफ रेलवन्स या नाट्य तत्वाला 25 वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित दिग्दर्शित नाटकांचा नाट्य महोत्सव संपूर्ण वर्षभर उत्सव स्वरूपात साजरा करण्यात आला. देशाची राजधानी दिल्लीपासून सुरू झालेला हा नाट्य महोत्सव आर्थिक राजधानी मुंबई ते ठाणे व्हाया पनवेल सांस्कृतिक राजधानी पुणे असा प्रवास करत सुरू आहे. या तीन दिवसीय नाट्य महोत्सवात लागोपाठ तीन वैचारिक आणि क्लासिक नाटकांचे प्रयोग झाले,
गर्भ, अनहद नाद आणि न्याय के भंवर में भंवरी!

मराठी रंगभूमीवर विविध नवनवीन प्रयोग सातत्याने होत असताना ‘वैचारिक मूल्य’ रुजवणारी व्यावसायिक नाटके असावीत हे स्वप्न मी चार वर्षांपूर्वी पाहिले…

- Advertisement -

मी व्यावसायिक नाटकांत काम करत असताना आजूबाजूला कॉमेडी नाटकेच चालतात, फेस व्हॅल्यू असणारे कलाकारच हवेत, वैचारिक वगैरे ते प्रायोगिकवाले बघून घेतील, आपण धंदा पाहावा अशा विचारसरणीचे वातावरण दिसले. नाटकांचे विषयदेखील बहुतांशी नवरा, बायको, लग्न, दारू… याच विषयांभोवती फिरत होते, नाटकांत, प्रामुख्याने व्यावसायिक पातळीवर वैचारिक दर्जा कसा निर्माण करता येईल आणि तो टिकून कसा राहील या विचारातूनच मराठी रंगभूमी वर रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित दिग्दर्शित अनहद नाद बहुभाषिक नाटक आले आणि गेल्या साडे तीन वर्षांपासून सतत या नाटकाचे प्रयोग होत आहेत.

सतत साडेतीन वर्षे सातत्याने मराठी व्यावसायिक रंगभूमीवर वैचारिक नाटकांचे प्रयोग करून मराठी रंगभूमीवरील पाच प्रतिबद्ध युवा कलाकारांनी हे शिवधनुष्य कोणत्याही निर्मात्याची मदत न घेता किंवा कोणतीही सरकारी वा निमसरकारी ग्रांट न घेता, कुठलीही स्पॉन्सरशीप न स्वीकारता केवळ जनसहयोगाने नाट्य प्रयोग सुरु ठेऊन कला उद्योजकतेचा नवा पाया रचला आहे.

- Advertisement -

थिएटर ऑफ रेलवन्स या नाट्य तत्वाला 25 वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित दिग्दर्शित नाटकांचा नाट्य महोत्सव संपूर्ण वर्षभर उत्सव स्वरूपात साजरा करण्यात आला. देशाची राजधानी दिल्लीपासून सुरू झालेला हा नाट्य महोत्सव आर्थिक राजधानी मुंबई ते ठाणे व्हाया पनवेल सांस्कृतिक राजधानी पुणे असा प्रवास करत सुरू आहे.

या तीन दिवसीय नाट्य महोत्सवात लागोपाठ तीन वैचारिक आणि क्लासिक नाटकांचे प्रयोग झाले,
गर्भ, अनहद नाद आणि न्याय के भंवर में भंवरी!

1. आजच्या यांत्रिकीकरणाच्या युगात मनुष्य रुपी देहांत ‘माणुसकीला’ शोधणारे नाटक गर्भ
2. खरेदी आणि विक्रीच्या काळात कलाकारांना वस्तुकरणातून उन्मुक्त करणारे नाटक
अनहद नाद –
आणि
3)अर्ध्या लोकसंख्येचा आवाज. पितृसत्तात्मक व्यवस्थेच्या शोषणा विरुद्ध हुंकार, न्याय आणि समतेची गाज, नाटक आहे, न्याय के भंवर में भंवरी!

या नाट्य महोत्सवाने एका चौकटीत अडकलेल्या कलेला उन्मुक्त केलं असं म्हंटल्यास वावगं ठरु नये. व्यावसायिक रंगभूमीवरील एकजात सगळीच व्यावसायिक गणिते न पाळता, कलात्मकता आणि वैचारिक प्रयोगांना या महोत्सवाने सुरवात केली गेली. आजचे मराठी रंगभूमीवरील नाटक मनोरंजनापासून सुरू होते आणि मनोरंजनातून एखादा संदेश देऊन थांबते. आजच्या व्यावसायिक नाटकांनी कलेचा मनोरंजनापुरता केलेला संकुचित उपयोग सतत दिसून येतो. मुळात कला ही परिवर्तन घडवून आणण्याचं सशक्त माध्यम आहे पण आज अशी किती नाटके आहेत जी मनोरंजनापासून सुरू होतात आणि परिवर्तन घडवून आणतात?  अशी ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ ची प्रत्येक नाटके भूमिका बजावतात व त्यामुळेच ती वेगळी उठून दिसतात.

अशा प्रकारे मराठी व्यावसायिक रंगभूमीवर नवी दृष्टी देणार्‍या वैचारिक नाटकांची मालिकाच सुरू करून अशा वैचारिक नाटकांना प्रेक्षक येत नाहीत हा भ्रम मोडीत काढत तिन्ही दिवस सुजाण आणि नव्याची ओढ असणार्‍या कलात्मक जाणिवा असणार्‍या रुचिसंपन्न प्रेक्षकांसमवेत हे नाट्य महोत्सव पार पडले. या महोत्सवातील दर्शकांनीच दाखवून दिले की अशा आशयघन, कलात्मक आणि वैचारिक खाद्य पुरवणार्‍या नाटकांची भूक प्रेक्षकांना आहे म्हणूनच हाऊसफुल्लचा अट्टाहास न धरता जे आले ते सुजाण विचारी आणि नव्याची कास धरणारे प्रेक्षक आम्हाला लाभले.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे नुसतं एखाद दुसरा प्रयोग करून ही नाटके थांबली नाहीत तर सतत सातत्याने या क्लासिक नाटकांचे प्रयोग होत आहेत आणि नुसते प्रयोगच नाही तर नाट्य महोत्सव साजरे होत आहेत.

वेळ सकाळची असो, दुपारची असो वा प्राईम टाइम प्रत्येक स्लॉट वापरून पाहिला आणि उत्तम वैचारिक नाटक पाहण्यासाठी कोणताही ‘स्लॉट’ महत्वाचा नसून ‘विचार’ महत्वाचा आणि तो ऐकण्यासाठी सकाळी 7 च्या प्रयोगाला ही वेळेवर हजर राहणारे प्रतिबद्ध प्रेक्षक आम्हांला लाभले.

व्यावसायिक नाटकासाठी आवश्यक असा कोणी मॅनेजर/मध्यस्थ आजही या प्रक्रियेत नाही. या नाटकांना आणि या महोत्सवाला कुणीही प्रोड्युसर, स्पॉन्सरर नाही किंवा कोणतेही सरकारी अनुदान घेतले जात नाही.

रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली कला उद्योजकता या संकल्पनेचा विस्तार केला गेला. यात कलाकार स्वतः प्रेक्षकांना भेटून नाटकाची संकल्पना, उद्देश्य सांगून नाटकासाठी आवश्यक इतकी सहयोग राशी गोळा करतात आणि जमा झालेल्या राशीमधून हा नाट्य महोत्सव साजरा होतो.

कला उद्योजकतेचे मूळ उद्देश्य हेच की, हरवलेली ‘संवाद’ प्रक्रिया परत मिळवणे आणि प्रेक्षक-कलाकाराचे नाते अधिक दृढ करणे. आजच्या बाजारीकरणाच्या युगात सगळीकडे केवळ पैसा बोलत असताना अशा प्रकारे मानवी संवेदनांना स्पर्श करणारी ही एकमेव पद्धती आहे आणि या महोत्सवाचा मूळ धागा ‘माणुसकी’ या विषयाशी जोडणारा असल्याने, या माणुसकीची सुरूवातच प्रेक्षक संवादाने होते. संवादातून आत्मीयता आणि आत्मीयतेतून सहकार्य निर्माण होते आणि अशा प्रकारे पूर्णतः सात्विक पद्धतीने, जनसहयोगाने हा नाट्य महोत्सव उभा राहतो.

थिएटर ऑफ रेलेवन्स तत्वज्ञानानुसार, प्रेक्षक हाच पहिला आणि सशक्त रंगकर्मी!! म्हणूनच प्रत्येक नाटक संपल्यानंतर कलाकारांना रंगमंचावर बोलावले जाते आणि त्यांचे मनोगत ऐकले जाते, मुळात माणूस म्हणून जगणार्‍या प्रत्येकाशी संबंधीत विषय असल्याने प्रत्येक सुजाण प्रेक्षक या प्रक्रियेशी जोडला जातो आणि तो व्यक्त होऊ पाहतो, अशा प्रकारे नाटकाचा सुरवातीचा भाग कलाकार सादर करतात आणि शेवटच्या भागात प्रेक्षक आपल्या मनोगतातून नाट्य प्रक्रियाच पुढे नेतात…
शिवाजी मंदिर दादर येथील थिएटर ऑफ रेलेवन्सच्या कलात्मक नाट्य महोत्सवाला तिन्ही दिवस हजेरी लावून ज्येष्ठ लेखक प्रेमानंद गज्वी यांनी महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रात ‘कलेचा हेतू-मानवी उन्नयन’ या शीर्षकाखाली या नाट्य महोत्सवातील ठळक बिंदू आणि महत्वपूर्ण वैशिष्ठ्ये मांडली आहेत. या कलात्मक नाट्य महोत्सवाचे कौतुक करताना गज्वी लिहितात, तीन दिवस मी अनुभवले सर्वांग सुंदर अनुभव, माणूस म्हणून उन्नत झालो, माणूस म्हणून माझी कर्तव्य काय याचं बोधीज्ञान, ज्ञपेुश्रशवसश मला मिळालं आणि हाच तर कलेचा हेतू!

साम चॅनलचे संपादक आणि ज्येष्ठ वक्ते संजय आवटे यांनीदेखील या महोत्सवातील नाटकाचे आणि मंजुल भारद्वाज यांच्या विचारांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना ‘आचार्य’ ही पदवी बहाल केली. मॅग्स मुंबई मासिकाचे संपादक उल्हास शिर्के यांनी कलात्मक प्रयोगासाठी ‘अनहद नाद’ नाटकाला सन्मानित केले आणि यापुढे अशा प्रकारच्या कलात्मक वैचारिक नाटकांसाठीच हा पुरस्कार देण्यात येईल हे घोषित केले. अशा प्रकारे अनेक कलावंतांनी, लेखक, समीक्षक, साहित्यिक, पत्रकार यांनी उपस्थिती लावून या नाट्य महोत्सवाची अनुभूती त्यांच्या शब्दांत व्यक्त केली आहे.

नाटक सुरु होण्यापूर्वी पडदा ही संकल्पनाच काढून टाकलेली असते आणि स्टेज रिकामा दिसतो, लोकं विचारतात, सेट कुठेय…? अरे लोकं जमा झाली आता पडदा लावा, पण कोणतीही लपवाछपवी न करता पारदर्शकता अवलंबली जाते. हे वेगळेपण शिवाजी मंदिर, दादरच्या स्टेज पाठीमागे कामे करणार्‍या तीन व्यक्तींच्या लक्षात आले त्यांनी सम्पूर्ण नाटक विंगेतून पाहिले आणि नाटक पाहून स्वतःहून प्रतिसाद दिला कि, गेली 30 ते 35 वर्षे मी इथे काम करतोय पण असे वेगळे सुंदर नाटक मी यापूर्वी कधीच पाहिले नाही… तुम्हाला शुभेच्छा!!
त्यांचे भावपूर्ण डोळे आमच्यात सकारात्मकता आणि समाधान भरून गेले….

नाटकाचा प्रयोग संपल्यानंतर प्रेक्षक संवाद या प्रक्रियेत असताना प्रेक्षक व्यक्त होत की, ही नाटके म्हणजे वैचारिक औषध आहे. आणि औषध घ्यायला आपण मेडिकलमध्ये जसे रात्री 2 वाजता ही जातो तसे हे वैचारिक औषध सकाळच्या प्रयोगातून घेतल्यास दिवसभर त्या विचाराचे मनन होत राहते व दुसर्‍या दिवशी त्या विचारला पुढे नेणारी श्रृंखला अनुभवायास मिळते. अशा प्रकारे हा तीन दिवसीय वैचारिक नाट्य डोस माणूस म्हणून जगण्याचे विचार पेरण्यास प्रतिबद्ध असतो. ही नाटके काळाची गरज आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे असेही मत एकमताने समोर आले.

अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर, कोमल खामकर आणि तुषार म्हस्के
आम्ही कलाकारांनी कलात्मक कलाकृतीची जबाबदारी घेतली आहे. केवळ नाटकातील संवाद म्हणून या संवादांकडे न पाहता त्या संवादातून मिळणारा बोध लक्षात घेऊन त्याप्रमाणे आचरण ही या नाटकाची कलाकारांकडून मागणी आहे. तेव्हाच कलात्मक सात्विकता आणि उन्मुक्तता कायम राहील.

कला ही केवळ मनोरंजना इतकीच मर्यादित न पाहता मनोरंजन ते परिवर्तन असा प्रवास थिएटर ऑफ रेलवन्स तत्वज्ञानावर आधारित मंजुल भारद्वाज लिखित नाटके करत असतात आणि कोणत्याही राजाश्रयावर अवलंबून न राहता संवादाच्या माध्यमातून जन सहयोगाने ही नाटके समाजात नवं परिवर्तन घडवून आणत आहेत!

– योगिनी चौक.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -