घरभक्तीMahashivratri 2023 : महाशिवरात्रीला 'या' 4 प्रहरात करा महादेवाची पूजा; जाणून घ्या शुभ मुहूर्त

Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीला ‘या’ 4 प्रहरात करा महादेवाची पूजा; जाणून घ्या शुभ मुहूर्त

Subscribe

महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची आराधना केल्याने जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते.हिंदू धर्मात भगवान शिवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की भगवान शिव हे अत्यंत दयाळू आणि कृपाळू देव आहेत. ते एका कलशातील पाण्यानेही प्रसन्न होतात. दर महिन्याला येणाऱ्या मासिक शिवरात्री सोबतच वर्षात येणाऱ्या महाशिवरात्रीलाही विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्री फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या दिवशी साजरी केली जाते. या दिवशी महाशिवाची पूजा विधी केल्याने इच्छित वराची प्राप्ती होते. असे मानले जाते की, या दिवशी व्रत केल्यास सौभाग्य प्राप्त होते.

महाशिवरात्री तिथी

महाशिवरात्री प्रारंभ : 18 जानेवारी, रात्री 8:02 पासून
महाशिवरात्री समाप्ती : 19 जानेवारी, संध्याकाळी 4 :18 पर्यंत असेल.
महाशिवरात्रीचे व्रत 18 जानेवारी, शनिवारी केले जाईल.

- Advertisement -

महाशिवरात्रीचे शुभ मुहूर्त

ब्रह्म मुहूर्ताची शुभ वेळ : सकाळी 05:15 ते 06:06
अभिजित मुहूर्त: दुपारी 12:13 ते 12:58
अमृत काल: दुपारी 12:02 ते 01:27
निशिता मुहूर्त: दुपारी 12:09 ते रात्री 01:00
सर्वार्थ सिद्धी योग: संध्याकाळी 05:42 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 06:56 पर्यंत असेल.

महाशिवरात्रीच्या पूजेचा शुभ मुहूर्त

- Advertisement -

प्रथम प्रहर पूजा
18 फेब्रुवारी: शनिवारी संध्याकाळी 06:41 ते रात्री 09:47

दुसऱ्या प्रहरची पूजा
18 फेब्रुवारी: शनिवारी रात्री 09:47 ते 12:53

तिसऱ्या प्रहरची पूजा
19 फेब्रुवारी: रविवारी रात्री 12:53 ते 03:58

चौथ्या प्रहरची पूजा
19 फेब्रुवारी: रविवार पहाटे 03:58 ते सकाळी 07:06

महाशिवरात्री पूजा विधि

  • या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून घरातील पूजेच्या ठिकाणी पाण्याने भरलेला कलश स्थापित करावा.
  • यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीच्या मूर्तीची स्थापना करा.
  • त्यानंतर अक्षत, पान, सुपारी, रोळी, मोली, चंदन, लवंग, वेलची, दूध, दही, मध, तूप, धतुरा, बेलपत्र, कमलगट्टा इत्यादी देवाला अर्पण करा.
  • महादेवाच्या स्तोत्रांचे आणि मंत्राचे पठण करा आणि आरती करा.
  • फाल्गुन महिन्यात येणारी महा शिवरात्री ही वर्षातील सर्वात मोठी शिवरात्री मानली जाते.

 


हेही वाचा :

Mahashivratri 2023 : शिवलिंगावर अर्पण करा ‘या’ गोष्टी; मंगळ, शनी दोषापासून मिळेल मुक्ती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -