घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

Subscribe

मेष :- इतरांची समस्या सोडवताना तुम्हाला त्रास होईल. अचानक खर्च निर्माण होईल. डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता आहे.

वृषभ :- व्यवसायाची चर्चा सफल होईल. घरगुती वाद मिटवता येईल. नवे मित्र-मंडळ तयार होईल.

- Advertisement -

मिथुन :- गैरसमज होण्याची शक्यता आहे. प्रेमाच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. वाहन जपून चालवा.

कर्क :- जुने येणे वसूल करा. मौज-मजेवर खर्च होईल. कला क्षेत्रात नवा परिचय होईल.

- Advertisement -

सिंह :- चांगल्या कल्पना सुचतील. कलावंत व्यक्तीचा मूड उत्तम राहील. नवीन लिखाण-लिहिले जाईल. घरगुती तणाव निवळेल.

कन्या :- घरात महत्त्वाचा निर्णय घेता येईल. खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. प्रवास होईल.

तूळ :- सुखाचा उपभोग घेताना तुमचे मन अस्वस्थ राहील. व्यवसायात लाभ होईल. प्रकृतीवर ताण पडेल.

वृश्चिक :- व्यवसायात चांगला निर्णय घेता येईल. प्रवासात आनंद मिळेल. प्रेम-प्रकरणाला चालना मिळेल.

धनु :- शेजार्‍याला मदत करावी लागेल. अचानक खर्च उद्भवण्याची शक्यता आहे. नवीन परिचय होईल.

मकर :- मुलांच्या समवेत एकमेकांचे विचार ऐकून घेता येतील. प्रवासाचा बेत यशस्वी होईल.

कुंभ :- मित्र-मंडळींसमवेत मौज मजेत वेळ जाईल. वाहन जपून चालवा. कायदा मोडू नका, चूक होईल.

मीन :- अपेक्षित व्यक्तीची भेट होेईल. कुटुंबात एकमत होईल. त्यामुळे वातावरण आनंदी राहील. मोठी खरेदी संभवते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -