घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य: शुक्रवार ०६ जानेवारी २०२२

राशीभविष्य: शुक्रवार ०६ जानेवारी २०२२

Subscribe

मेष ः- धंद्यात मेहनतीचा उत्तम मोबदला मिळेल. सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. आर्थिक सहाय्य घेता येईल.

वृषभ ः- दिवसाच्या दुसर्‍या प्रहरात तुमच्या कामांना गती मिळेल. प्रवासात घाई करून उपयोग होणार नाही.

- Advertisement -

मिथुन ः- सकाळी लवकर महत्त्वाची कामे करून घ्या. धंद्यात जम बसेल. मागील येणे वसूल करा.

कर्क ः- तुमच्या कार्याला दिशा देता येईल. तुमचे मुद्दे प्रेमाने व संयमानेच सर्वांना पटवून द्या. कायदा पाळा.

- Advertisement -

सिंह ः- आनंदी रहाल. प्रकृतीत सुधारणा होईल. घरगुती समस्या सोडवताना स्वतःच्या चुकासुद्धा विचारात घ्या.

कन्या ः- दुपारनंतर सकाळचा वाद निपटण्याचा प्रयत्न करता येईल. घरातील व्यक्ती तुमच्याबरोबर मदतीसाठी येतील.

तूळ ः- सकाळी कामे करून घ्या. वाहन जपून चालवा. संध्याकाळी मनावर दडपण येईल. खर्च वाढेल.

वृश्चिक ः- दुपारनंतर तुमचा उत्साह वाढेल. शांत डोक्याने प्रश्न सोडवा. दुसर्‍याला कमी लेखू नका.

धनु ः- नवीन ओळखीचा उपयोग करून घेता येईल. संध्याकाळी तुमचा अंदाज चुकण्याची शक्यता आहे.

मकर ः- प्रयत्नाने कोणताही प्रश्न सोडवता येतो. जिद्द ठेवा. रागाने स्वतःचेच नुकसान होण्याची शक्यता असते.

कुंभ ः- धंद्यातील चुका शोधून काढता येतील. कला-क्रीडा-साहित्यात मोठ्या लोकांची ओळख होईल.

मीन ः- तुमच्या भावनांची कदर केली जाईल. धंद्यातील वाद मिटेल. मोठे काम मिळवता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -