घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शुक्रवार २९ मार्च २०२४

राशीभविष्य : शुक्रवार २९ मार्च २०२४

Subscribe

मेष – आप्तेष्ठांची भेट होईल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. दिवस आनंदात जाईल. मनावरील दडपण कमी होईल.
वृषभ – कोर्टाच्या कामात यश मिळेल. वाटाघाटीसंदर्भात सविस्तर चर्चा करता येईल. तणाव कमी होईल. धंदा मिळेल.
मिथुन – धंद्यात मोठा फायदा होईल. नोकरवर्गाच्या मागण्या पूर्ण कराल. जमिनीच्या कामात तणाव होईल. शांत राहा.
कर्क – कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. नावलौकिक वाढेल. कल्पनाशक्तीला चालना मिळेल. नोकरीत पदाधिकार मिळेल.
सिंह – घरातील काही प्रश्न सर्वांच्या संमतीने सोडवावयाचे असतात. सामाजिक कार्यात प्रमाणिकपणे कामे करा. गर्व नको.
कन्या – कठीण, रेंगाळलेले काम लवकर करून घ्या. सहकारी कामात मदत करतील. नवीन ओळख होईल. कला क्षेत्रात चमकाल.
तुला – कला-क्रीडा क्षेत्रात तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल. दुसर्‍याला कमी समजू नका. नवीन विषय शिकाल.
वृश्चिक – घरातील प्रश्न नीट समजून घ्या. म्हणजे योग्य प्रकारे उत्तर शोधता येईल. कृती करा. कल्पना पुरे करा. यश मिळेल.
धनु – धंद्यातील परिस्थिती सुधारता येईल. नोकरवर्गाची मेहनत सार्थकी लागेल. नवीन ओळख झाली तरी एकदम गुप्त गोष्ट सांगू नका.
मकर – तुमची योजना वेगाने पुढे जातील. शेअर्समध्ये गुंतवणुकीचा प्रयत्न करा. कोर्टाच्या कामात यश मिळेल. थकबाकी मिळवा.
कुंभ – मनावर, शरीरावर दडपण येईल. मुलांची काळजी वाढेल. शत्रूंच्या गुप्त कारवायांवर लक्ष ठेवा. कमी बोला. शांत राहा.
मीन – आजचे काम उद्यावर टाकणारा माणूस आळशी असू शकतो. कार्यतत्पर राहा. कोर्ट केस जिंकाल. धंद्यात नवे काम मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -