राशीभविष्य : शनिवार, २१ नोव्हेंबर २०२०

horoscope
राशीभविष्य

मेष :दुसर्‍यांचे विचार ऐकून घ्या. वादविवादाचा प्रसंग घरात, बाहेर निर्माण होईल. औषध वेळेवर घ्या.

वृषभ :विरोध मोडून काढता येईल खाण्याची काळजी घ्या. कठीण काम करण्याचा प्रयत्न करा. मदत घेता येईल.

मिथुन :वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. आप्तेष्ठांच्या कार्यक्रमात भाग घ्यावा लागेल. स्पर्धेत तुमचे कौतुक होईल.

कर्क :जिद्दीने तुम्ही प्रगतीचा नवा टप्पा गाठू शकाल. धंद्यात वाढ करता येईल. जवळचे लोक मदत करतील असे मानू नका.

सिंह :समस्या सोडवता येईल. जुने स्नेही भेटतील. स्पर्धेत काटे की टक्कर द्यावी लागेल. प्रवास करावा लागेल.

कन्या :तुमचे महत्त्व सामाजिक क्षेत्रात वाढेल. ओळखी होतील. धंद्यात मोठे काम मिळेल. मित्र भेटतील.

तूळ :कटकटी होत आहेत असे वाटेल. एखादी वस्तू वेळेवर मिळणे कठीण आहे. एकाग्र मनाने कोणतेही काम करा.

वृश्चिक :महत्त्वाचे काम आज करा. भेट घेण्यात यश मिळेल. चर्चा सफल होईल. दूरच्या प्रवासाचे ठरवाल.

धनु :चांगल्या व्यक्तीचा सहवास मिळेल. स्पर्धेत कठीण प्रसंग निभवावा लागेल. सामाजिक कार्य कराल.

मकर :लोकप्रियता मिळवणे सोपे नसते. राजकारणात अनेक प्रसंगाचा सामना करावा लागतो.

कुंभ :धंद्यात फायदेशीर योजना कळेल. पैसा मिळेल. धावपळ होईल. अचानक कामात बदल करावा लागेल.

मीन :आज ठरविलेले काम पूर्ण करा. आळस करू नका. धंद्यात लक्ष द्या. फायदा होईल. ओळख होईल.