राशीभविष्य: गुरुवार १८ मे २०२३

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : धंद्यात फायदा होईल. सामाजिक कार्यासाठी मदत घेता येईल. प्रतिष्ठा वाढेल. तुमचे नावलौकिक वाढेल.

वृषभ : कामे झाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरीत वरिष्ठ खूश होतील. प्रेमात यश मिळेल.

मिथुन : जुने मित्र पैशाची मागणी करतील. प्रवासात सावध रहा. अनाठाई खर्च करावा लागेल.

कर्क : नोकरीत प्रमोशन मिळेल. परदेशात जाण्याची आशा निर्माण होईल. धंद्यात वाढ होईल.

सिंह : वाटाघाटीत यश मिळेल. जुने येणे वसूल करा. जमीन, घर, खरेदी-व्रिकीत फायदा होईल.

कन्या : वरिष्ठांना दुखवू नका. धंद्यात वाढ होईल. नोकरवर्गाला सांभाळून घ्या. तुटक वागवू नका.

तूळ : धंद्यात फायदा होईल. तुमच्याबरोबर स्पर्धा करणारे वाढतील. धावपळ होईल.

वृश्चिक : घरात आनंदाची बातमी कळेल. जीवनसाथी निवडता येईल. मान-सन्मान मिळेल.

धनु : कायद्याचे पालन करा. आपसात गैरसमज होऊ शकतो. महत्त्वाचे काम करण्याचे विसराल.

मकर : प्रकृतीची काळजी घ्या. तुमच्या क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. थकबाकी मिळवा. धंदा मिळेल.

कुंभ : क्षुल्लक तक्रार शेजारी करतील. घरातील कामे वाढतील. तुमच्यावर जेलसी करणारे येतील.

मीन : अपेक्षा पूर्ण होईल. नातलगांसाठी धावपळ होईल. धंद्यात प्रयत्न करा. चांगले यश येईल.