Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई बोगस पतपेढी आणि कोट्यवधींची फसवणूक; आरोपी अटकेत

बोगस पतपेढी आणि कोट्यवधींची फसवणूक; आरोपी अटकेत

Subscribe

 

मुंबईः बोगस पतपेढी काढून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. रामसिंग चौधरी, असे या आरोपीचे नाव आहे. छोटे व्यावसायिक व फेरीवाल्यांना सहा वर्षांत पैसे दुप्पट करण्याचे अमिष दाखवत चौधरीने फसवणूक केल्याचा आरोप आहे.

- Advertisement -

प्रतिज्ञा नावाची पतसंस्था काढून चौधरीने गुंतवणूकदारांची फसवणूक केली. धक्कादायकबाब म्हणजे साईलीला पतसंस्थेचे शिक्के आणि लेटरहेड वापरुन चौधरीने प्रतिज्ञा नावाची बोगस पतसंस्था काढली होती. ‘लाडली योजना’ आणि इतर योजनांच्या माध्यमातूनही मुलींच्या वडिलांना अडीचपट लाभ व प्रचंड नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. या अमिषाला बळी पडून गुंतवणूकदारांनी पतसंस्थेत पैसे गुंतवले. मुदत संपूनही चौधरीने गुंतवणूकदारांचे पैसे परत केले नाही. याप्रकरणी पाच जणांनी मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी याचा गुन्हा दाखल करुन तपास केला. तपासात आरोपी रामसिंग चौधरी याने लॉकडाऊनच्या काळात गरीब जनतेने जमा केलेली रक्कम बँकेत जमा केल्याचे उघड झाले. त्याचा कर्ज म्हणून वापर करून तो अधिक नफा आणि व्याज कमवत होता, असे पोलीस चौकशीत समोर आले. धक्कादायकबाब म्हणजे आरोपी रामसिंग हा गोरेगाव येथेच ‘साबेरा’ ही दुसरी पतसंस्था उघडून फसवणुकीचा धंदा चालवत होता. मालाड पोलिसांनी तपास करत आरोपीपर्यंत पोहोचून त्याला अटक केली. पोलीस याचा अधिक तपास करत आहे.

गेल्याच महिन्यात नाशिक येथील कैलास नागरी पतसंस्थेतील कोट्यवधी रुपयांच्या अपहार प्रकरणी केलेल्या लेखापरिक्षणात मोठी तफावत समोर आली. बँक खात्यात बोगस भरणा दाखवून संस्थेतील रोख शिल्लक घटवून तब्बल २२ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे शासकीय लेखापाल एस. टी. शिंदे यांनी उघडकीस आणले. मात्र सनदी लेखापाल अनिल घैसास यांच्या मते हा अपहार २.८५ लाखाचा आहे. दोन्ही लेखापरिक्षणात मोठी तफावत असून त्यामुळे ठेवीदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

- Advertisement -

या प्रकरणातील लेखापरिक्षण अहवालानुसार कैलास नागरी सहकारी पतसंस्थेचे खाते असलेले नामको बँक, देना बँकेच्या दैनंदिन व्यवहारात अपहार झाल्याचे म्हटले आहे. संस्थेतील कामकाज पाहता बर्‍याच ठिकाणी शिल्लक जादा ठेवल्याचे दिसून आले. संस्थेत जमा झालेल्या रकमा बँकेत भरण्यासाठी नेवून प्रत्यक्षात त्या बँकेत भरल्याच जात नव्हत्या. त्यामुळे नेमका हा पैसा कुणाकडे जात होता याविषयी त्र्यंबकमध्ये उलटसुलट चर्चा होत आहे. इतर बँकांमध्ये भरण्यासाठी संस्थेतून काढलेल्या रकमा याचा पुरावा घेण्याची जबाबदारी कॅशियरची असताना याबाबत कुठलेच कामकाज झालेले दिसून येत नाही. या कालावधीत दिनकर मोरे हे कॅशियर म्हणून काम बघत होते. तर काही वेळेस मृत कर्मचारी अनिल पाटील हे रोखपाल म्हणून काम करत होते.

- Advertisment -