राशीभविष्य : मंगळवार ०२ मे २०२३

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष-कोणत्याही कामात अधिरता ठेवल्यास भ्रमनिरास होण्याची शक्यता आहे. संयम ठेवा.

वृषभ-महत्वाची बातमी कळेल. कोर्टकेसमध्ये यश मिळविण्याचा प्रयत्न करता येईल.

मिथुन-आर्थिक व्यवहारात लाभ होईल. जुने येणे वसूल करा. प्रेमाला चालना देणारी व्यक्ती सहवासात येईल.

कर्क-मनाची द्विधा अवस्था कमी होईल. मोठी खरेदी झाल्याने आनंद वाटेल. मान-सन्मानाचा योग येईल.

सिंह-शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे. तुमचे कठोर शब्द इतरांना दुःख देऊ शकतात.

कन्या-दृढ निश्चयाने एखादे काम करता येईल. शत्रूला चोख उत्तर देता येईल. वरिष्ठांना वश करता येईल.

तूळ-महत्वाच्या व्यक्तीची भेट होईल. धंद्यात लाभ होईल. मान-सन्मानाचा योग येईल. मौजमजेत वेळ जाईल.

वृश्चिक-उत्साहवर्धक फोन येईल. कामाच्या उत्साहात दिवस जाईल. व्यस्त राहता येईल.

धनु-प्रमाणाबाहेर काम करण्याच्या स्वभावाने थकवा जाणवेल. स्वच्छ हवेत फेरफटका मारा.

मकर-जीवनाला कलाटणी मिळेल.घरात आनंदी वातावरण राहील. संततीबद्दल विचार कराल.

कुंभ-तुमच्याबद्दल गैरसमज करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. धंद्यावर लक्ष द्या. आळस महागात पडेल.

मीन-मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. मौजमजेत वेळ जाईल. निसर्गाच्या सहवासात मन रमेल.