राशीभविष्य: मंगळवार ०७ जून २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासात दगदग होईल. मोठ्या लोकांच्या बरोबर चर्चा कराल. स्पर्धेत प्रगती होईल.

वृषभ : आज ठरविलेले काम करून घ्या. आळस करू नका. मुलांनी मोठ्यांपासून काही लपवू नये.

मिथुन : तुमच्या कामात यश व नावलौकिक मिळेल. आर्थिक लाभ होईल. स्पर्धेत प्रगती होईल. धंदा वाढेल.

कर्क : कला-गुणांचे कौतुक होईल. मिळालेली कोणतीही संधी सोडू नका. नविन विषयात रस घ्याल.

सिंह : आवडत्या क्षेत्रात चमकाल. परदेशात जाण्याचा योग येईल. नोकरीत वर्चस्व वाढेल. अरेरावी करू नका.

कन्या : आजचे काम आजच करा. तुम्हाला कठीण प्रसंगातून जावे लागेल. आक्रमक भूमिका घेऊ नका.

तुला : विचारांची चलबिचल होईल. पोटाकडे लक्ष ठेवा. मान-प्रतिष्ठा मिळण्यासाठी प्रयत्न करा.

वृश्चिक : तुमचा अंदाज बरोबर आल्याने वेगाने पुढे जाता येईल. स्पर्धेत नावलौकिक होईल. आळस करू नका.

धनु : तुमचा विचार सर्वांना पटवून देता येईल. नोकरी लागेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल.

मकर : कठीण कामे करून घ्या. ओळखीचा उपयोग करून घ्या. नम्रपणे तुमचे मत सांगा.

कुंभ : ठरविलेले काम व्यवस्थित पूर्ण करू शकाल. नवे मित्र-मंडळ तयार होईल. प्रतिष्ठा वाढेल.

मीन : प्रगतीची संधी मिळेल. रागावर ताबा ठेवा. वरिष्ठांच्या मर्जीनुसार कामे करावी लागतील.