सलमान खान धमकी प्रकरणात पोलिसांनी घेतले 4 जणांचे जबाब, वडिलांसह भावाचा समावेश

Police take statements from 4 people in Salman Khan threat case

अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांनी जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यामुळे त्याच्या घराच्या सुरक्षेत तातडीने वाढ करण्यात आली आहे. गृहखाते धमकीनंतर सक्रिय झाले असून सलमान आणि सलीम खान यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी 4 जणांचे जबाब नोंदवल्याची माहिती रोलिसांनी दिली आहे. यात सलमा खान, वडील सलीम खान, भाऊ अरबाज खान, भाऊ सोहेल खान यांचा समावेश आहे.

200 पेक्षा जास्त सीसीटीव्ही ताब्यात –

सलमान खान धमकी प्रकरणात पोलिसांनी 200 पेक्षा जास्त सीसीटीव्ही ताब्यात घेतले आहेत. मुंबई गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या 10 टीम प्रकरणाची चौकशी करत आहेत. याबाबत मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबई पोलिसांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतले आहे. पोलीसांनी अभिनेत्याची भेट घेतली असून या प्रकरणाची चौकशी आम्ही करत आहोत. आत्तापर्यंत या प्रकरणात कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. गरज वाटली तर सुरक्षा अधिक वाढवण्यात येईल, अशी माहिती दिली आहे.

सलमान खान हैदराबादला रवाना –

अभिनेता सलमान खान यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला. यानंतर तो दुपारी तीनच्या सुमारास हैदराबादला रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. हैदराबादमध्ये सलमान खान शुटिंगसाठी गेल्याची माहिती सूत्रानी दिली आहे. सलमान नुकताच IIFA अवॉर्ड्स सोहळा होस्ट करून आला आहे. सध्या त्याचे कभी ईद, कभी दिवाली सिनेमाचे चित्रीकरण सुरू आहे. सलमान खान टायगर सीरिजच्या तिसऱ्या टायगर-3वरही तो सध्या काम करत असून आमीर खानच्या ‘लाल सिंह चड्डा’ आणि शाहरुखच्या ‘पठाण’मध्येही तो गेस्ट एपियरन्स दिसणार आहे.