राशीभविष्य: बुधवार १३ जुलै २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : अपरिचित व्यक्तीची नीट पारख करूनच त्याला मदत करा. उसने पैसे जास्त घेऊ नका.

वृषभ : किरकोळ कारणामुळे कामात बदल करावा लागेल. कोर्टाच्या कामात बेसावध राहू नका.

मिथुन : तुमचे ध्येय निश्चित करा म्हणजे मन अस्थिर होणार नाही. तुमच्या कामाची वेळ ठरवून भेट घ्या.

कर्क : व्यवसायात मोठा फायदा होईल. नवा बदल करण्याचे ठरवता येईल. वरिष्ठांचे सहाय्य मिळेल.

सिंह : नव्या विषयाचा अभ्यास करण्यात यश मिळेल. धंद्यात फायदा होईल. शेअर्सचा अंदाज घेता येईल.

कन्या : कामाचा व्याप वाढेल. राग वाढेल. हट्टीपणाचा कळस करू नका. दुसर्‍याला कमी लेखू नका.

तुला : इतरांची मदत मिळेलच असे समजू नका. तुमचा अंदाज चूकणार नाही. हिशोब नीट करा.

वृश्चिक : धंद्यात नवा पर्याय मिळेल. नवे गिर्‍हाईक शोधता येईल. मनाप्रमाणे घटना घडतील.

धनु : शोध कार्यात यश मिळेल. बंधु-भगिनींची भेट घडेल. थकबाकी मिळवा. धंदा वाढेल.

मकर : ठरविलेल्या कामात अडचण येऊ शकते. बदल करण्याची वेळ येईल. जिद्द ठेवा. यश येईल.

कुंभ : आजचे काम आळसाने थांबवू नका. जुने लोक तुमचा हेवा करतील. खर्च वाढेल.

मीन : गोड बोलून गिर्‍हाईकाबरोबर वागा. राग हा विनाशकारी असतो. प्रतिष्ठा राहील.