राशीभविष्यः बुधवार ८ मार्च २०२३

rashi bhavisha

 

मेष ः- आजचा निर्णय आजच घ्या. भेट घ्या. चर्चा करा. लोकांना तुमचा मुद्दा पटवून द्या. नवे काम मिळवा.

वृषभ ः- कायद्याच्या संबंधी काम करून घेता येईल. नोकरीत वरिष्ठ खूश होतील. धंदा वाढेल.

मिथुन ः- तुम्हाला विरोध करणारा माणूस मैत्री करण्यास येईल. नोकरीत वरिष्ठांना खूश करा. प्रेमात वाद संभवतो.

कर्क ः- अधिकार भांडून मिळणे कठीण आहे. अरेरावी नको. गुप्त कारवायांचा बिमोड प्रेमानेच करा. यश मिळवा.

सिंह ः- तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रेमाची माणसे तुमचे मन सांभाळतील. धंद्यात सुधारणा होईल.

कन्या ः- आज तुमच्या मनात गोंधळ तयार होईल. शांतपणे विचार करा. रात्री उशिरा चांगला मार्ग तुम्हाला मिळेल.

तूळ ः- आजच तुमचा उत्साह राहील. कामे करून घ्या. संततीची प्रगती होईल. मान-प्रतिष्ठा मिळेल.

वृश्चिक ः- तुमचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत रहा. लोकांचे, सरकारी वर्गांची मदत मिळेल. आवडते पदार्थ मिळतील.

धनु ः- तुमच्या कार्याला वेग येईल. कुणावर विश्वास टाकायचा याचा नीट विचार करा. खरेदी कराल.

मकर ः- प्रकृतीची काळजी घ्या. वादविवाद जास्त करू नका. आज कदाचित तडजोड करावी लागेल.

कुंभ ः- महत्त्वाचा निर्णय घेता येईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. प्रतिष्ठा मिळेल. वास्तू खरेदीचा विचार होईल.

मीन ः- वाद व तणाव होईल. रस्त्याने चालताना काळजी घ्या. दुखापत होऊ शकते. धंद्यात दुर्लक्ष करू नका.