आजचे राशीभविष्य

rashi bhavisha

राशीभविष्य 16 may 2023

मेष : घरातील समस्येवर उपाय सापडेल. मान वाढेल. तणाव कमी होईल. मुले सहाय्य करतील.

वृषभ : घरातील जबाबदारी ओळखून वागावे लागेल. तुम्ही ठरविलेला निर्णय बदलावा लागू शकतो.

मिथुन : महत्त्वाचे काम करून घ्या. दिशा मिळेल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. नवे मित्र मिळतील.

कर्क : कोर्ट कचेरीच्या कामात चमकाल. नोकरीत चांगला बदल करता येईल. गैरसमज दूर कराल.

सिंह : तणाव कमी होईल. जुना वाद मिटवता येईल. पाहुणे येतील. कला, क्रीडा, साहित्यात चमकाल.

कन्या : तुमच्या मताला विरोध होऊ शकतो. प्रकृतीची काळजी घ्या. मनावर, शरीरावर ताण पडेल.

तूळ : ठरविलेले काम पूर्ण कराल. नोकरीत प्रगती होईल. जीवनाविषयी चांगला निर्णय घ्याल.

वृश्चिक : विरोधाला सामोरे जावे लागेल. मोठ्या लोकांची मदत मिळेल. धंद्यात चांगले काम मिळेल.

धनु : तुमच्या क्षेत्रात तुम्हाला प्रगतीची संधी मिळेल. जुना वाद मिटवता येईल. वाटाघाटीत यश मिळेल.

मकर : प्रसंग गंभीर असला तरी तुम्ही सावधपणे वागा. कामाचे कौतुक होईल. पण व्याप वाढेल.

कुंभ : आत्मविश्वासाने तुमचे ध्येय गाठता येईल. धंद्यात वाढ होईल. तुम्हाला प्रसिद्धी मिळेल.

मीन : कोर्टाच्या कामात बेसावध राहू नका. अतिरेकीपणाने कुठेही वागू नका. यशस्वी दिवस आहे.