घरभविष्यसावधान! सूर्यग्रहणात मंगळ-बुध ग्रहाची अशुभ युती; 'या' राशींवर होईल नकारात्मक परिणाम

सावधान! सूर्यग्रहणात मंगळ-बुध ग्रहाची अशुभ युती; ‘या’ राशींवर होईल नकारात्मक परिणाम

Subscribe

20 एप्रिल रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण असेल. हे ग्रहण 20 एप्रिल रोजी सकाळी 7:04 वाजता सुरु होणार असून दुपारी 12:29 पर्यंत असणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. या दिवशी अमावस्या देखील आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार, यावेळी ग्रहण मेष राशीत अश्विनी नक्षत्रात होणार आहे. या दिवशी मिथुन राशीत मंगळ आणि मेष राशीत बुध असल्यामुळे अतिशय अशुभ योग तयार होत आहे. मंगळ मेष आणि मिथुन बुधचा स्वामी आहे. यासोबतच सूर्यग्रहणाच्या वेळी राहू आणि बुधासोबत सूर्य मेष राशीत असेल. विरुद्ध राशीमध्ये बुध आणि मंगळाच्या उपस्थितीमुळे परिवर्तन योग तयार होत आहे, ज्याचा प्रभाव सर्व राशींच्या राशीच्या लोकांच्या जीवनात स्पष्टपणे दिसून येईल. परंतु काही राशीच्या लोकांवर त्याचा नकारात्मक प्रभाव अधिक पहायला मिळेल.

- Advertisement -

या राशींवर होईल नकारात्मक परिणाम

  • मेष

ज्योतिष शास्त्रानुसार, मेष राशीच्या लोकांना या काळात विशेष काळजी घ्यावी लागेल. हा बदल या राशीसाठी खूप अशुभ परिणाम देईल. या काळात आत्मविश्वास कमी होऊ शकतो. यावेळी तुम्ही कायदेशीर बाबींमध्ये अडकू शकता. नात्यात चढ-उतार येऊ शकतात. अनावश्यक खर्च टाळा.

- Advertisement -
  • वृषभ

वृषभ राशीसाठी देखील हा बदल अशुभ आहे. यावेळी आत्मविश्वास कमी होईल. भविष्याच्या चिंतेने तणाव वाढेल. कामाच्या ठिकाणी कोणाशी तरी भांडण होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. प्रवास टाळा.

  • कन्या

ज्योतिष शास्त्रानुसार, कन्या राशींच्या व्यक्तींसाठी या काळात मानसिक तणाव जाणवेल. कौटुंबीक समस्या सतावतील. जीवनसाथीसोबत मतभेद होतील.

  • तूळ

तूळ राशींच्या व्यक्तींना नोकरी, व्यवसायात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. गुंतवणूक करण्यासाठी योग्य काळ नाही. जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी घ्या. डोळे आणि दातांसंबंधित समस्यांचा सामना करावा लागेल.

  • मकर

या काळात मकर राशीच्या व्यक्तीचे आरोग्य बिघडू शकते. कामात मन लागणार नाही. अनेक समस्यांचा सामना करावा लागेल. कौटुंबीक समस्या सतावतील.

 


हेही वाचा :

तुम्ही तुमचे भारतीय राष्ट्रीयत्व… पाकिस्तानी अभिनेत्याने केलं प्रियंका चोप्राला ट्रोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -