घरभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यराशीभविष्य बुधवार, २० मे २०२०

राशीभविष्य बुधवार, २० मे २०२०

Subscribe

मेष : तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. लोकांचे सहाय्य मिळेल. आप्तेष्ठांना, घरातील व्यक्तींना खूश करू शकाल.

वृषभ : रागाच्या भरात माणूस नको ते शब्द बोलून जातो. कुणालाही दुखवू नका. वाहन जपून चालवा.

- Advertisement -

मिथुन : आजचे काम उद्यावर टाकल्यास अडचणी वाढू शकतात. घरातील व्यक्तीसाठी धावपळ होईल.

कर्क : कायद्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका. सरकारी कामात मदत घेता येईल. गुप्त शत्रू शोधा.

- Advertisement -

सिंह : आजचे काम आजच करा. नातलगांची मदत घेता येईल. कोर्टाच्या कामात यश मिळेल.

कन्या : नातलगांसाठी खर्च करावा लागेल. वेळेला महत्त्व द्या. धंद्यात मोठे काम मिळेल.

तूळ : कला-क्रीडा क्षेत्रात नवीन ओळखी होतील. वरिष्ठांच्या विरोधात जाऊ नका. दगदग कमी करा.

वृश्चिक : जवळच्या माणसांसाठी काम करावे लागेल. आर्थिक मदत करण्याचा विचार नको. मित्राला समस्या येईल.

धनु : घरगुती कामे करता येतील. क्षुल्लक वादाला महत्त्व देऊ नका. नातलगांच्या मदतीने काम होईल.

मकर : आज तुम्ही जो निर्णय घ्याल तो कदाचित चुकण्याची शक्यता आहे. रागावर ताबा ठेवा. धंद्यात वाद करू नका.

कुंभ : आजच महत्त्वाचे काम करून घ्या. सावधपणे गुप्त कारवाया ओळखून ठेवा. धंदा वाढेल.

मीन : शेअर्समध्ये फायदा होईल. स्पर्धा जिंकाल. पदाधिकार मिळेल. थकबाकी वसूल करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -