राशीभविष्य रविवार १७ एप्रिल ते शनिवार २३ एप्रिल २०२२

Weekly Horoscope Future Sunday 12th June to Saturday 18th June 2022
राशीभविष्य

मेष ः- मीन राशीत बुध प्रवेश, चंद्र गुरू प्रतियुती होत आहे. धंद्यात व्यवहारीक दृष्टीकोन ठेऊन निर्णय घेऊ शकाल. तुमची मानसिक स्थिती चांगली राहील. घरातील वातावरण आनंदी राहील. संतती संबंधी समस्या कमी होईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व लोकांना पटेल. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. कला-क्रीडा क्षेत्रात पुरस्कार, आर्थिक लाभ मिळेल. कोर्टमध्ये योग्य शब्द वापरा. यश खेचता येईल. केस संपवता येईल. नोकरीत चांगला बदल करता येईल. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. परीक्षेत उत्साह राहील. यश मिळेल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवता येईल.
शुभ दि. 1८,1९

वृषभ ः- मीनेत बुध प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात मागे राहू नका. प्रयत्नाने मोठे काम मिळवता येईल. नोकरीत कायद्याचे पालन करा. दबावाखाली राहून चूक होऊ शकते. संसारात वाद न वाढवता प्रश्न सोडवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न सप्ताहाच्या सुरुवातीला होईल. संयम ठेवा. आक्रमक भूमिका घेऊ नका. व्यसनाने नुकसान होईल. कला-क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल. मोठे काम मिळेल. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. परीक्षेसाठी चांगले प्रयत्न करा. वाकड्या वाटेने यश मिळवण्याचा प्रयत्न करू नका. वाहन जपून चालवा.
शुभ दि. १7,१8

मिथुन ः मीन राशीत बुध, धनु राशीत गुरू वक्री आहे. चंद्र गुरू प्रतियुती होत आहे. धंद्यातील तणाव कमी करता येईल. कर्जाचे काम लवकर करून घेता येईल. मोठे कंत्राट मिळवाल. घरातील तणाव कमी होईल. शुभ समाचार मिळेल. घर, वाहन खरेदीचा व्यवहार करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या बाजूने चांगली घटना घडेल. प्रसिद्धी मिळेल. योजना पूर्ण करा. आळस करू नका. संधी कमी आहे. सप्ताहाच्या मध्यावर क्षुल्लक वाद होईल. संशोधनात प्रगती होईल. अधिकार मिळेल. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळवता येईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. कोर्ट केस संपवण्याचा प्रयत्न करा. शुभ दि. 20,21

कर्क ः- या सप्ताहात मीन राशीत बुध प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला धंद्यात, नोकरीत चांगली प्रगती होईल. नवे काम मिळवता येईल. कायद्याचे पालन सर्व ठिकाणी करा. राजकीय-सामाजिक कार्यात गुप्त कारवायांचा त्रास होईल. प्रतिष्ठा सांभाळता येईल. घरातील प्रश्न सोडवताना काळजी घ्या. जीवनसाथी, मुले यांच्याशी तणाव होईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कोर्ट केसमध्ये जास्त मेहनत घ्यावी लागेल. संशोधनाच्या कामात धावपळ होईल. कामाचा व्याप वरिष्ठ देतील. परीक्षेसाठी मुलांनी आळस न करता अभ्यास करा. सकस आहार घ्यावा. शुभ दि. 1७,18

सिंह ः- मीन राशीत बुध प्रवेश, चंद्र प्रवेश, चंद्र गुरू प्रतियुती होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात अनुभवी लोकांचा उपयोग करून घ्या. प्रतिष्ठा वाढवण्यासाठी कोणत्या योजना बनवायच्या ते ठरवता येईल. उतावळेपणा व अहंकार ठेऊ नका. धंद्यात काम मिळेल. संयमाने बोला. कर्जाचे काम करून घेण्याचा प्रयत्न करा. जमिनीचे काम करून घेता येईल. कोर्ट केसमध्ये नम्रतेने मुद्दे मांडता येतील. संशोधनाच्या कामात वरिष्ठांचा दबाव राहील. विद्यार्थी वर्गाने अभ्यासात जास्त मेहनत घ्यावी. यश मिळवता येईल. नोकरीत व्याप वाढेल. घरातील तणाव कमी करता येईल. समस्या सोडवता येईल. कायदा पाळा. शुभ दि. 20,21

कन्या ः- मीन राशीत बुध प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला वाद, तणाव होईल. प्रवासात सावध रहा. वाहन जपून चालवा. धंद्यात काम मिळेल. प्रयत्न करा. कायद्याचे पालन करा. राजकीय-सामाजिक कार्यात प्रगती करता येईल. लोकांना दुखवू नका. नोकरीत अचानक बदली झाल्याने मन अस्थिर होण्याची शक्यता आहे. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नवीन ओळख झालेल्या व्यक्तीवर जास्त भरवसा ठेऊ नका. प्रेमात तणाव होईल. जीवनसाथीची चिंता वाढेल. संशोधनाच्या कामात यश मिळेल. विरुद्धलिंगी व्यक्तीपासून मनस्ताप होऊ शकतो. महत्त्वाची वस्तू सांभाळा. विद्यार्थ्यांनी आळस करू नये. शुभ दि. 1९,22

तूळ ः- या सप्ताहात मीन राशीत बुध प्रवेश, चंद्र गुरू प्रतियुती होत आहे. धंद्यात भावनेच्या भरात कोणताही व्यवहार करू नका. काम मिळू शकेल. सप्ताहाच्या मध्यावर मन उदास होईल. मानसिक ताण निर्माण होईल. महत्त्वाची मौल्यवान वस्तू सांभाळा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्याकडून मोठे काम करून घेतले जाईल. अधिकार मिळण्यास विलंब होईल. रागावर ताबा ठेवा. प्रवासात सावध रहा. संसारात क्षुल्लक ताण जास्त वाढवू नका. खेळकर वृत्तीने प्रश्न सोडवा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. संशोधनाच्या कामात धावपळ वाढेल. दुखापत होऊ शकते. काळजी घ्या.
शुभ दि. 21,2३

वृश्चिक ः या सप्ताहात मीन राशीत बुध प्रवेश, चंद्र शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यात वाढ होईल. धावपळ करावी लागेल. प्रवासात सावध रहा. घरगुती तणाव छोटा असेल. मनावर एखाद्या कामाचा ताण राहील. नोकरीत अचानक बदल संभवतो. चांगली संधी मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला नेटाने काम करावे लागेल. विरोधक चुका दाखवून हलकल्लोळ करण्याचा प्रयत्न करतील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी घ्या. तुमचे कौतुक होईल. परदेशात जाण्याचा योग येईल. थोरा-मोठ्यांचे सहकार्य मिळेल. संशोधनात दडपण राहील. रागावर नियंत्रण ठेवा. कोर्ट केसमध्ये जिद्दीने यश मिळवता येईल. शुभ दि. 18,2०

धनु ः- या सप्ताहात मीन राशीत बुध प्रवेश, चंद्र गुरू प्रतियुती होत आहे. धंद्यातील ठप्प झालेल्या गोष्टींना पुन्हा सक्रिय करता येईल असा प्रयत्न करा. स्वतःची मेहनतच माणसाला त्याच्या उद्योगाला मोठे करू शकते. थकबाकी वसूल करा. घरातील समस्या कमी होतील. अडचणीत आलेले काम करून घ्या. मंगळवार, बुधवार प्रवासात सावध रहा. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्ही वेगाने तुमची प्रगती करून घ्या. नवी दिशा मिळेल. कला-क्रीडा-साहित्यात प्रगतीची संधी मिळेल. नवीन झालेल्या ओळखीचा उपयोग करून घेऊ शकाल. नोकरीत चांगला बदल करण्याचा विचार यशस्वी होईल. संशोधनात प्रगती मिळेल. कोर्ट केस संपवता येऊ शकते. शुभ दि. 1७,21

मकर ः- मीन राशीत बुध प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. साडेसातीचे पहिले पर्व सुरू आहे. कोणताही निर्णय घेताना तुमची दिशाभूल होऊ शकते. कुणी तुम्हाला वेगळी वाटही दाखवण्याचा प्रयत्न करेल. कोणताही निर्णय स्वतःची प्रतिमा राखूनच घ्यावा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा ठसा उमटवणे सोपे नाही. धंद्यात नवीन संधी मिळेल. कायदा मोडून नोकरीत निर्णय घेऊ नका. कुटुंबातील व्यक्तीचा विचार सुद्धा घेतल्यास बरे राहील. कला-क्रीडा-साहित्यात प्रगती होईल. नवीन प्रसिद्ध माणसे भेटतील. संशोधनाच्या कार्यात कठीण प्रसंगावर मात कराल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासाची कास सोडू नये. परदेशात जाण्यासाठी वाकडी वाट धरू नका. शुभ दि. 22,2३

कुंभ ः- मीन राशीत बुध प्रवेश, चंद्र गुरू प्रतियुती होत आहे. हा सप्ताह म्हणजे अनेक कामे पूर्ण करणारा ठरू शकेल. धंद्यात वाढ करता येईल. नवे काम मिळवता येईल. संसारात सुखद संवाद साधता येईल. वास्तू जमीन खरेदी-विक्रीत फायदा मिळेल. शेअर्समध्ये लाभ होईल. चांगली गुंतवणूक तुम्ही करू शकाल. राजकीय-सामाजिक कार्याला वेग मिळेल. प्रतिष्ठा, पैसा मिळवता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. नवीन ओळख होईल. कोर्ट केस संपवून तणाव पूर्ण होऊ शकाल. नोकरी लागेल. संशोधनाच्या कामात यश मिळेल. विद्यार्थी वर्गाचे स्वप्न पूर्ण होईल. शुभ दि. 19,21

मीन ः- या सप्ताहामध्ये तुमच्याच राशीत बुध प्रवेश चंद्र गुरू प्रतियुती होत आहे. धंद्यातील बर्‍याच अडचणी सोडवता येतील. कठोर बोलणे कुठेही करू नका. घरातील माणसांचा अवमान करू नका. तुमचे मन स्थिर ठेवता येईल. तसा प्रयत्न करा. नोकरीत वरिष्ठ खूश होतील. चांगला बदल करण्याची संधी येऊ शकते. राजकीय-सामाजिक कार्यातील विघ्न कमी होईल. लोकांच्या गरजा समजून घ्या. स्वतःच्या खाण्याची काळजी घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात मोठ्या लोकांची मदत घेता येईल. संशोधनाच्या कामात यश येईल. दूरच्या प्रवासात सावध रहा. विद्यार्थी वर्गाने आळस करू नये. कोर्ट केसमध्ये मोठे यश मिळवता येईल. गोड बोलून फसवणार्‍या व्यक्तीपासून सावध रहा.
शुभ दि. 18,20