घर भविष्य साप्ताहिक राशीभविष्य राशीभविष्य रविवार १८ जून ते शनिवार २४ जून २०२३

राशीभविष्य रविवार १८ जून ते शनिवार २४ जून २०२३

Subscribe

मेष ः या सप्ताहात मिथुन राशीत शुक्र प्रवेश. सूर्य हर्षल लाभयोग होत आहे. धंद्यात मेहनत घ्या. काम मिळवा. थकबाकी ठेवू नका. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्व टिकवता येईल. नवीन कल्पना सुचेल. ओळखीचा उपयोग करून घेता येईल. सप्ताहाच्या मध्यावर कुणीतरी अपमानास्पद वागणूक देण्याचा प्रयत्न करेल. घरगुती कामे होतील. जवळचे लोक तुमच्या बाजूने उभे राहतील. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. नवीन ओळखीतून काम मिळू शकेल. नोकरीत वरिष्ठ खूश होतील. संशोधनात यश मिळेल. विद्यार्थी वर्गाला नवा अभ्यास निवडण्यास चांगले सहकार्य मिळेल. शुभ दि. १८, २२

वृषभ ः मिथुनेत शुक्र प्रवेश करीत आहे. चंद्र, बुध त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात लक्ष द्या. चांगली संधी मिळेल. त्याचा फायदा करून घ्या. जम बसवता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. लोकसंग्रह मोठा करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. लोकसंग्रह मोठा करता येईल. घरातील ताणतणाव कमी होईल. सप्ताहाच्या शेवटी अचानक खर्च निर्माण होऊ शकतो. कायद्याचे पालन करा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. योग्य तोच अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी निवडावा. वेळेला महत्त्व द्यावे. शुभ दि. १९, २३

- Advertisement -

मिथुन ः तुमच्याच राशीत शुक्र प्रवेश, सूर्य हर्षल लाभयोग होत आहे. धंद्यात चांगला फायदा होईल. तणाव मिटवण्यात यश मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला मानाचे स्थान मिळण्याची शक्यता आहे. जबाबदारी वरिष्ठ तुमच्याकडे देतील. घर, जमीन, यासंबंधी समस्या मिटवता येईल. शेअर्समध्ये सावधपणे निर्णय घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात सौम्य धोरण ठेवा. आठवड्याच्या शेवटी शुभ समाचार मिळेल. कोर्ट केसमध्ये झगडून यश मिळेल. संशोधनाच्या कामात पुढे जाल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. विद्यार्थी वर्गाने स्वतःचे मन स्थिर ठेवावे. अभ्यासक्रम निवडताना गोंधळ करू नये. शुभ दि. २०, २४

कर्क ः- मिथुन राशीत शुक्र प्रवेश, चंद्र, गुरू त्रिकोणयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला धंद्याला गैरसमज होऊ शकतो. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. वरिष्ठ तुमच्या कामात तुम्हाला मदत करतील. राजकीय-सामाजिक कार्यात योजनांना गती द्यावी लागेल. कायद्याचे पालन करा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धीसाठी वेळ लागेल. क्षुल्लक वाद मैत्रीत निर्माण होईल. घरगुती कामे रेंगाळू शकतात. नातलगांना मदत करावी लागेल. संशोधनाच्या कामात जास्त धावपळ होईल. दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधक करतील. विद्यार्थी वर्गाने नवीन प्रवेश अर्ज नीटपणे भरावा. चूक होऊ शकते. नम्रपणे बोलावे. शुभ दि. १८, २१

- Advertisement -

सिंह ः- मिथुन राशीत शुक्र प्रवेश, सूर्य हर्षल लाभयोग होत आहे. धंद्यात तडजोड करावी लागण्याची शक्यता आहे. भागिदाराशी संबंध बिघडण्याची शक्यता सप्ताहाच्या मध्यावर आहे. गोड बोलून काम करा. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्व राहील. तुमच्याशी वाटाघाटीच्या प्रश्नावर मतभेद होऊ शकतात. परिस्थिती सावरून घेता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. नवीन ओळख उत्साहवर्धक ठरेल. मागील येणे वसूल करा. संसारातील वाद मिटवता येईल. आत्ताच प्रयत्न करा. संशोधनाच्या कामात पुढे जाल. नोकरीत बदल करण्याची संधी मिळू शकते. कॉलेज प्रवेशात विद्यार्थ्यांनी गोंधळ करू नये. शुभ दि. १९, २२

कन्या ः- मिथुन राशीत शुक्र प्रवेश, चंद्र, गुरू त्रिकोण योग होत आहे. तुमच्या मनावर एखादे दडपण आल्याने तुम्ही अस्वस्थ व्हाल. संयमाने वागा. प्रश्न सोडवता येईल. धंद्यात लवकर समस्या सोडवा. मोठे काम घेऊन ठेवा. मागील येणे वसूल करा. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा टिकवता येईल. पुढील निवडणुकीसाठी जोरदार काम करा. लोकसंग्रह वाढवता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. चांगल्या लोकांचा सहवास मिळेल. प्रवासात घाई करू नका. हातघाईवर न येता काम करा. व्यसनाने नुकसान होईल. संशोधनात प्रगती होईल. नवीन कॉलेज प्रवेशासाठी योग्य प्रयत्न करा. चूक टाळा. घरातील माणसे मदत करतील. शुभ दि. २०, २३

तूळ ः- मिथुनेत शुक्र प्रवेश, सूर्य हर्षल लाभयोग होत आहे. धंद्यात जम बसेल. क्षुल्लक कारणावरून वाद झाला तरी त्याकडे दुर्लक्ष करा. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठित लोकांच्या सहवासात रहाल. पुढील राजकीय उलाढालीत तुम्हाला स्थान मिळू शकेल. संसारातील समस्या सोडवाल. आप्तेष्ठांच्या भेटी होतील. घर, जमीन, खरेदी-विक्रीत फायदा होईल. शेअर्सचा अंदाज घेता येईल. योग्य ठिकाणी गुंतवणूक होऊ शकेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. ठरविलेले स्वप्न पूर्ण करता येईल. कोर्ट केस जिंकाल. संशोधनात यश मिळेल. नवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे निवडता येईल. शुभ दि. २१, २४

वृश्चिक ः- मिथुनेत शुक्र प्रवेश, चंद्र, बुध त्रिकोणयोग होत आहे. नोकरीत कामाचा व वरिष्ठांचा दबाव राहील. कायद्याचे उल्लंघन कुठेही करू नका. धंद्यात सुधारणा होईल. मोठे काम मिळेल. थकबाकी वसूल करा. राजकीय-सामाजिक कार्यात काही लोक तुमच्यावर नाराज होण्याची शक्यता आहे. स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या. घरातील कामे वाढतील. धावपळ होईल. शेअर्सचा अंदाज घाईत घेऊ नका. कला-क्रीडा क्षेत्रात तडजोड करावी लागेल. नवीन झालेल्या ओळखीवर एकदम विश्वास टाकू नका. व्यसनाने त्रास होईल. संशोधनात कटकटी होतील. विद्यार्थ्यांनी प्रवेश फॉर्म व्यवस्थित भरावेत. संगत योग्य ठेवावी. शुभ दि. १८, २०

धनु ः- या सप्ताहात मिथुनेत शुक्र प्रवेश, सूर्य हर्षल लाभयोग होत आहे. साडेसातीचे पर्व सुरू आहे. धंद्यात अडचण निर्माण होईल. नोकर, भागीदार वाद करतील. नम्रपणे समस्या सोडवा. बोलताना सावध रहा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व राहील. सप्ताहाच्या शेवटी जवळचे लोक शुभ समाचार देतील. पुढील निवडणुकीसाठी चांगले प्रयत्न करा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. मोठे लोक मदत करतील. कौतुक होईल. नोकरीत बदल करण्याचा विचार कराल. संशोधनाच्या कामात यश मिळेल. कोणत्या क्षेत्रात प्रवेश घ्यावयाचा याचा योग्य विचार विद्यार्थ्यांनी करावा.
शुभ दि. १९, २१

मकर ः- मिथुनेत शुक्र प्रवेश, चंद्र, बुध त्रिकोणयोग होत आहे. साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. मन खंबीर राहील. अडचणीवर मात करावी लागेल. कुणालाही राजकीय-सामाजिक क्षेत्रात कमी लेखू नका. तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न होईल. धंद्यात लक्ष द्या. मोठे कंत्राट मिळवता येईल. कोर्ट केस सोपी नाही. मदत मिळणे कठीण आहे. कला-क्रीडा क्षेत्रात मेहनत घ्या. प्रसिद्धीसाठी झगडावे लागेल. नोकरीत यशस्वीपणे काम कराल. वरिष्ठांचा दबाव राहील. संयम ठेवा. संशोधनाच्या कामात जिद्द ठेवा. युक्ती वापरा. विद्यार्थी वर्गाला प्रवेशासाठी उशीर लागू शकतो. शुभ दि. २०, २२

कुंभ ः- मिथुन राशीत शुक्र प्रवेश, सूर्य हर्षल लाभयोग होत आहे. तुमचा आत्मविश्वास शाबूत राहील. धंद्यात समस्या येऊ शकते. कामगारांचा तुटवडा होऊ शकतो. प्रश्न मात्र सोडवता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे मुद्दे मांडता येईल. प्रतिष्ठा राहील. बोलताना वेळेचे भान ठेवा. संसारात शुभ समाचार मिळेल. नोकरीत प्रभाव पडेल. योग्य ठिकाणी बदली करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. स्पर्धा जिंकाल, परदेशात जाण्याची संधी मिळेल. कोर्ट केस, मतभेद लवकर संपवा. प्रवासाचा बेत आखाल. वाहन हळू चालवा. विद्यार्थ्यांना प्रगतीचा मार्ग मिळेल. शुभ दि. २१, २३

मीन ः मिथुन राशीत शुक्र प्रवेश, चंद्र, बुध त्रिकोण योग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला किरकोळ अडचण येईल. रागावर ताबा ठेवा. विचलित होऊ नका. धंद्यात जम बसेल. घर-जमीन खरेदी विक्री करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात अधिकार मिळेल. पुढील निवडणुकीसाठी चांगला प्रयत्न करता येईल. योजना तयार करा. दौरे करा. मागे राहू नका. तुमचा प्रभाव दाखवता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात मेहनतीने यश मिळेल. कोर्ट केस संपवता येईल. परदेशात जाल. नोकरीत चांगला फायदा होईल. बढती-बदलीची शक्यता निर्माण होईल. विद्यार्थ्यांना मोठे यश मिळेल. शुभ दि. २२, २४

- Advertisment -