घर भविष्य साप्ताहिक राशीभविष्य राशीभविष्य रविवार २५ जून ते शनिवार ०१ जुलै २०२३

राशीभविष्य रविवार २५ जून ते शनिवार ०१ जुलै २०२३

Subscribe

मेष ः या सप्ताहात चंद्र, शुक्र युती, चंद्र, नेपच्यून त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात किरकोळ समस्या होईल. नोकरवर्गाच्या विचारांना समजून घ्यावे. राजकीय-सामाजिक कार्यात, दौर्‍यात यश मिळेल. लोकप्रियतेत भर पडेल. नवे कार्य नियोजन नीट पद्धतशीरपणे करा. घरगुती वातावरण मनासारखे राहील. संततीची प्रगती होईल. नोकरीत प्रभाव पडेल. वरिष्ठ खूश होतील. प्रवासाचा बेत आखाल. वाहन हळू चालवा. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. ओळखीतून नवे काम मिळेल. संशोधन कार्यात प्रगती होईल. कोर्टाच्या कामात आशा वाढतील. विद्यार्थी वर्गाला चांगले यश व प्रवेश मिळू शकेल. शुभ दि. २५, २९

वृषभ ः या सप्ताहात चंद्र, बुध लाभयोग, चंद्र, मंगळ युती होत आहे. धंद्यात जम बसेल. मोठे काम मिळवा. प्रयत्नाला यश मिळेल. ओळखीचा उपयोग करून घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात दिशा मिळेल. अधिकाराचा वापर चांगल्या कामासाठी करा. जम बसवा. घरगुती तणाव कमी होईल. मोठ्या व्यक्तीचा सल्ला घेता येईल. घर घेण्याचा विचार कराल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी, नवे काम मिळेल. नोकरीत बदल करता येईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. कोर्ट केस, वाद लवकरच संपवा. संशोधनात प्रगती होईल. विद्यार्थी वर्गाला मनाप्रमाणे प्रवेश घेता येईल. शुभ दि. २६, ३०

- Advertisement -

मिथुन ः या सप्ताहात चंद्र, शुक्र युती, चंद्र, बुध लाभयोग होत आहे. बुद्धिचातुर्याने धंद्यात वाढ करता येईल. समस्या सोडवा. गुंतवणूक योग्य प्रकारे होऊ शकेल. शेअर्समध्ये बुधवारपासून अंदाज नीट घेता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रभाव वाढेल. लोकांच्या मनातील आळस दूर करता येईल. जनहिताचा विचार नेहमी करा. कार्य करा. कला-क्रीडा क्षेत्रात पुरस्कार मिळेल. कोर्ट केस जिंकण्याची जिद्द ठेवा. घरात शुभ समाचार मिळेल. नोकरीचा प्रयत्न करा. नवीन परिचयाचा उपयोग करून घेता येईल. संशोधनाच्या कामात वरिष्ठ खूश होतील. शिक्षणात पुढे जाल.
शुभ दि. २७, ०१

कर्क ः- या सप्ताहात चंद्र, मंगळ युती, चंद्र, गुरू त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात तुम्हाला मिळते जुळते धोरण ठेवून धंदा चालवावा लागेल. जिद्द ठेवा. सप्ताहाच्या मध्यावर संसारात समस्या येऊ शकते. नोकरीत कायद्याचे पालन करून कामात लक्ष द्या. चूक होऊ शकते. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला प्रतिष्ठा टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. रागावर ताबा ठेवा. बुद्धिचातुर्य वापरा. अहंकाराने वागल्यास समस्या वाढेल. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. स्पर्धेत मेहनत घ्या. संशोधनाच्या कामात अडचणी वाढतील. विद्यार्थ्यांनी चांगली संगत ठेवावी. स्वतःच्या योग्यतेनुसार अभ्यासक्रम निवडावा. शुभ दि. २५, २८

- Advertisement -

सिंह ः- या सप्ताहात चंद्र, नेपच्यून त्रिकोणयोग, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. कठीण परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करा. धंद्यात वाद होईल. नोकरमाणसे टिकवणे हे तुमचे कौशल्य ठरेल. सप्ताहाच्या मध्यावर आर्थिक व्यवहारात सावध रहा. मैत्रीच उपयोगी पडू शकते. राजकीय सामाजिक कार्यात प्रभाव राहील. लोकप्रियता मिळेल. वाटाघाटीत यश मिळेल. नोकरीत चांगला बदल करण्याची संधी मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. नवीन परिचय होईल. संशोधनाच्या कामात यश मिळेल. कोर्ट केस जिद्दीने जिंकता येईल. नवीन अभ्यासक्रम निवडता येईल. शुभ दि. २६, २९

कन्या ः- या सप्ताहात चंद्र, बुध युती, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यात सुधारणा करून मोठे काम मिळवता येईल. प्रयत्नाला यश मिळेल. मागील येणे वसूल करा. नोकरीत चांगला बदल शक्य होईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या कामाचे कौतुक होईल. अधिकार मिळेल. लोकांच्या समस्या सोडवता येतील. त्यात मागे राहू नका. घरगुती वातावरण आनंदी राहील. मुलांची, जीवनसाथीची प्रगती सुखावह राहील. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. कोर्ट केस संपवा. विद्यार्थी वर्गाने विचारपूर्वक अभ्यासक्रम निवडावा. घर, वाहन, जमीन खरेदी करता येईल. शुभ दि. २७, ३०

तूळ ः- या सप्ताहात चंद्र, गुरू प्रतियुती, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला धावपळ होईल. महत्त्वाची कामे मार्गी लागण्याचे समाधान मिळेल. धंद्यात वाढ होईल. होणारा फायदा योग्य ठिकाणी गुंतवा. नवीन परिचय उत्साहवर्धक ठरेल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रगतीचा नवा टप्पा गाठता येईल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. घरगुती कामे होतील. घर, जमीन इत्यादी खरेदी-विक्रीत फायदा होईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी, पुरस्कार मिळेल. नोकरी लागेल. तुमचे स्वप्न पूर्ण करता येईल. शोधकार्यात यश मिळेल. वर्चस्व वाढेल. मनाप्रमाणे बदली करून घेता येईल. विद्यार्थ्यांनी ध्येयावर लक्ष केंद्रित करावे. शुभ दि. २८, ०१

वृश्चिक ः- या सप्ताहात चंद्र, गुरू प्रतियुती, चंद्र, बुध युती होत आहे. धंद्यात अरेरावी करू नका. मोठे काम करून घ्या. थकबाकी वसुलीमध्ये तणाव होऊ शकतो. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. घरात तुमच्याबद्दल गैरसमज होईल. तुमचा पाणउतारा होऊ शकतो. नमते धोरण ठेवा. प्रकृतीची काळजी घ्या. खाण्याची चंगळ नको. पैसा विनाकारण उधळू नका. घर, जमीन खरेदीत फायदा होईल. धोरणात चूक करू नका. कला-क्रीडा क्षेत्रात मतभेद होईल. कोर्ट केस सोपी नसेल. विद्यार्थी वर्गाने योग्य सल्ल्याने नवीन अभ्यासक्रम निवडावा. शुभ दि. २५, २७

धनु ः- या सप्ताहात चंद्र, शुक्र युती, चंद्र, नेपच्यून त्रिकोणयोग होत आहे. तुमच्या धंद्यात तणाव होईल. कायद्याचे पालन करा. प्रवासात घाई नको. कामगार लोक त्रस्त करतील. तुमचे बोलणे कठोर वाटेल. संमिश्र स्वरूपाच्या घटना घडतील. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा राहील. गुप्त कारवायांना समजून घ्या. निष्कारण अडचणी आणण्याचा प्रयत्न होईल. तुम्ही खचू नका. आप्तेष्ठ मदत करतील. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. कोर्ट केस जिद्दीने जिंका. बोलताना सावध रहा. कामात यश मिळेल. धावपळ जास्त होईल. खर्च होईल. विद्यार्थी वर्गाने गोंधळ करण्याची गरज नाही. मन स्थिर ठेवा. शुभ दि. २६, २८

मकर ः- या सप्ताहात चंद्र, बुध युती, चंद्र, गुरू त्रिकोणयोग होत आहे. संसारात तात्पुरत्या समस्या येतील. वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. जीवनसाथीची मर्जी राखा. धंद्यात नवा पर्याय समोर येईल. मोठे काम मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रयत्न होईल. तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न होईल. डोके शांत ठेवा म्हणजे योग्य उत्तर देता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात जवळचे लोक नाराजी दाखवतील. वाद होईल. कोर्ट केस कठीण आहे. सावध रहा. राजकीय क्षेत्रात तुम्हाला डावलले जाण्याची शक्यता आहे. नको असलेले काम नोकरीत करावे लागेल. विद्यार्थी वर्गाने हिंमत ठेवावी. प्रवेश पत्रिका नीटपणे भरावी. शुभ दि. २७, २९

कुंभ ः- या सप्ताहात चंद्र, शुक्र युती, चंद्र, गुरू त्रिकोणयोग होत आहे. या सप्ताहात कठीण प्रसंगाचा सामना करावा लागेल. मार्ग शांत मनानेच शोधता येईल. धंद्यात तणाव होईल. वाद वाढू शकतो. थकबाकी मिळणे कठीण पडेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. जनहितासाठी चांगला निर्णय घेऊ शकाल. बोलताना सर्व ठिकाणी सावध रहा. लोकप्रियता वाढवाल. घरातील कामे होतील. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात नवा प्रयोग करू शकाल. कौतुक होईल. कोर्टाची केस लवकर संपवा. क्रीडा क्षेत्रात यश मिळेल. विरोधकांना नमवता येईल. विद्यार्थी वर्गाला मनाप्रमाणे प्रवेश घेता येईल. शुभ दि. २८, ३०

मीन ः या सप्ताहात चंद्र, बुध युती, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. महत्त्वाच्या कामात तुम्हाला यश मिळेल. प्रयत्नांचा जोर वाढवा. धंद्यात फायदा होईल. कामे मिळतील. घरगुती समस्या सोडवता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात योजनांना गती देता येईल. लोकांची समस्या समजून घ्या. त्यानुसार कार्यारंभ करा. पद मिळेल. नोकरीत चांगला बदल होईल. गुंतवणूक करू शकाल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. काम मिळेल. कोर्ट केस संपवता येईल. प्रमोशन होईल. प्रवासाचा बेत आखाल. वाहन हळू चालवा. व्यसनी लोकांपासून दूर रहा. विद्यार्थ्यांना यश मोठे मिळेल. शुभ दि. ३९, ०१

- Advertisment -