घरलाईफस्टाईलआरोग्यदायी पिंपळ वृक्ष

आरोग्यदायी पिंपळ वृक्ष

Subscribe

पिंपळाचा वृक्ष हा फार पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. वेगवेगळ्या सणवारानुसार आणि परंपरेनुसार पिंपळवृक्षाची पुजाही केली जाते. हा वृक्ष अनेक रोग बरोबर करण्या सोबतच त्वचेसाठी सुद्धा लाभदायी आहे. चला तर मग जाणून घेऊया चमत्कारी वृक्षाचे आरोग्यदायी लाभ.

चेहर्‍यावरील सुरकुत्यांसाठी 

पिंपळ वृक्षाची मुळी ही चेहर्‍यावरील सुरकुत्या नष्ट करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. या वृक्षाच्या मुळांमध्ये अँटीऑक्सीडंट्स तत्वे विपूल प्रमाणात असतात. या वृक्षाची मुळी कापून ती पाण्यात काही वेळ भिजत घालावी नंतर ती वाटून त्याची पेस्ट चेहर्‍याला लावावी. असे नियमित केल्यास तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या कमी होतील.

- Advertisement -

सर्दी पडसे बरे करण्यासाठी 

पिंपळाची पाने दुधात उकळून घ्यावीत व नंतर त्या मिश्रणात साखर टाकून सकाळ-संध्याकाळ सेवन केल्याने सर्दी पडसे लवकर बंद होते.

- Advertisement -

दमा रोगावर 

 पिंपळाची पाने दुधात किंवा पाण्यात उकळून बनवलेल्या काढ्याचे सेवन केल्याने दमा बरा होतो.

घोळणा फुटणे 

पिंपळाच्या पानाचे काही देठ घेऊन त्याचा रस बनवावा व तो नाकपुडीमध्ये सोडल्याने घोळणा फुटण्याची समस्या दूर होते.

दातांसाठी 

पिंपळाच्या फांद्यांपासून बनलेल्या मऊ काडीने दात घासावेत त्यामुळे दात बळकट होतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -