घरलाईफस्टाईलरोज खा ३० ग्रॅम्स ओट्स...बघा काय आहेत फायदे

रोज खा ३० ग्रॅम्स ओट्स…बघा काय आहेत फायदे

Subscribe

रोज ओट्सचा नाश्ता केल्यास, तुमची तब्बेत तंदुरुस्त राहते. वेगवेगळ्या स्वादात मिळणारे हे ओट्स रोज ३० ग्रॅम खाल्ल्यास शरीराला होणारे फायदे तुमच्यासाठी.

हल्ली सगळ्यांच्याच घरी वजन आटोक्यात ठेवण्यासाठी ओट्सचा वापर केला जातो. तसंच ओट्स हा असा पदार्थ आहे, जो खायला स्वादिष्ट असतोच पण त्याचे फायदेही अनेक असतात. रोज ओट्सचा नाश्ता केल्यास, तुमची तब्बेत तंदुरुस्त राहते. वेगवेगळ्या स्वादात मिळणारे हे ओट्स रोज ३० ग्रॅम खाल्ल्यास शरीराला होणारे फायदे तुम्हाला आमच्या लेखातून सांगणार आहोत. यातील एका विशिष्ट प्रकारचं फायबर अर्थात ‘बीटा ग्लुकेन’ शरीराला चांगला फायदा करून देतं. जाणून घेऊया काय आहेत ओट्सचे फायदे.

उच्च रक्तदाबापासून आराम – उच्च रक्तदाबाची समस्या असणाऱ्या लोकांना रोज ओट्स खाणं अतिशय उपयुक्त आहे. नियमित ओट्स खाण्यामुळं तुम्हाला रक्तदाबाची समस्या उद्भवत नाही. तर यात असणाऱ्या फायबरमुळं रक्तदाब वाढण्याची शक्यता कमी होते.

- Advertisement -

मधुमेहासाठी गुणकारी – मधुमेही व्यक्तींसाठी ओट्स खाणं गुणकारी असतं. वैद्यांच्या सांगण्यानुसार, लेमन ओट्स खाल्ल्यास, साखरेचं शरीरातील प्रमाण कमी होतं. शिवाय नाश्त्यामध्ये ओट्स खाल्ल्यामुळं जास्त भूक न लागता पोट साफ राहतं. पोट साफ राहिल्यामुळं इतर आजार होण्याची संभावना नसते.

ह्रदयविकारावर फायदेशीर – रोज ओट्स खाल्ल्यामुळं ह्रदयाशी निगडीत आजार होण्याची संभावना कमी होते. बीटा ग्लुकेन फायबरमुळं कोलेस्ट्रॉलची पातळी योग्य राहते. तसंच यामध्ये असणाऱ्या अँटी ऑक्सीडेंट एवनेथ्रामाइड्स एलडीए कोलेस्ट्रॉलच्या फ्री रेडिकल्सपासून सुटका मिळते. तसंच ह्रदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते.

- Advertisement -

बद्धकोष्ठतेपासून सुटका – ओट्स खाल्ल्यामुळं बद्धकोष्ठतेपासून सुटका होते. यातील अनसॉल्युबल फायबरमुळं बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि पचनशक्ती वाढते. ओट्समध्ये कॅल्शियम, पोटेशियम, विटामिन बी आणि मॅग्नेशियमचं प्रमाण जास्त असतं. तुमच्या नर्व्हस सिस्टिमला यापासून व्यवस्थित राखून ठेवते.

त्वचेला झळाळी – त्वचेसाठीदेखील ओट्सचा फायदा असतो. त्वचेवरील झळाळी ओट्समुळं चांगली राहते. त्यामुळं त्वचेमध्ये कोमलता येते. एखाद्याची त्वचा जास्त कोरडी असल्यास, खाज आणि जळजळ होण्याची समस्या होते. त्यावेळी ओट्स फायदेशीर ठरते. एक चमचा ओट्स कच्च्या दुधात भिजवून त्याची पेस्ट बनवावी. ही पेस्ट तोंड आणि हातापायाला लावल्यास, त्वचेला झळाळी येते.

वजन कमी होते – तुम्ही लठ्ठ असल्यास, रोज ओट्स खावेत. यामध्ये लो कोलेस्ट्रॉल आणि कॅलरीज कमी असतात. ज्यामुळं वजन कमी होण्यास फायदा होतो. शिजलेले ओट्स शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करतात.

तणाव दूर होतो – ओट्समध्ये असलेल्या फायबर आणि मॅग्नेशियममुळं डोक्यातील सेरोटोनिनची मात्रा वाढते. त्यामुळं डोकं शांत राहून चांगली झोप लागते. यामध्ये ब्लूबेरीदेखील मिसळू शकता. त्यामुळं विटामिन – सीदेखील मिळू शकते आणि तणाव दूर व्हायला मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -