घरताज्या घडामोडीतुम्हाला उशी शिवाय झोप लागत नाही का? जाणून घ्या उशी शिवाय झोपण्याचे...

तुम्हाला उशी शिवाय झोप लागत नाही का? जाणून घ्या उशी शिवाय झोपण्याचे फायदे

Subscribe

उशी शिवाय झोपल्याने अधिक वेळ चांगली झोप येते

आपल्याकडे बऱ्याच जणांना झोपताना उशी घेऊन झोपायची सवय आहे. उशीशिवाय त्यांना झोपच लागत नाही. मात्र उशी घेऊन झोपल्याने अनेक समस्यांना समोरे जावे लागते. उशी घेऊन झोपल्याने मानदुखीचा त्रास सुरु होतो. त्याशिवाय डोके दुखी यासारखी दुखणी मागे लागतात. मात्र तरीही काही जणांना उशी शिवाय झोप लागत नाही. उशी नसेल तर त्यांची झोपच होत नाही. पण उशी न वापरणे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. उशी घेऊन झोपल्याचे तोटे तर आपल्याला माहिती आहेत. मात्र उशी शिवाय झोपल्याने आपल्याला कोणते फायदे होतात जाणून घ्या.

मान आणि पाठीचे दुखणे बंद होते

बऱ्याच जणांना उशी घेऊन झोपल्याने मान आणि पाठीचे दुखणे सुरु होते. डोक्याच्या आणि मानेच्या भागात सतत दुखू लागते. मात्र उशी शिवाय झोपल्यास ही दुखणी दूर होतात. उशी शिवाय झोपल्याने अधिक वेळ चांगली झोप येते.

- Advertisement -

डोके दुखी थांबते

बऱ्याच जणांचे सकाळी उठल्या उठल्या डोके दुखण्यास सुरुवात होते. कदाचित उशी घेऊन झोपल्यानेही डोके दुखी होत असेल. त्यामुळे उशी शिवाय झोपल्यास डोके दुखी थांबते. सकाळी उठल्यावर ताजेतवाणे वाटते.

मुरुम येणे थांबते

अनेकांच्या चेहऱ्यावर मुरुमे किंवा पिंपल्स येतात. उशी घेऊन झोपणे हे त्यामागचे एक कारण असू शकते. कारण आपण बरेच दिवस पांघरुण, उशांचे कव्हर धुत नाहीत. त्यावर जंतु,धुळ जमा होते. ती धुळ,जंतु आपल्या चेहऱ्यावर जमा होते. त्यामुळे चेहऱ्यावर तेल साचते, छिद्र बंद होतात आणि डाग होऊ शकतात. उशी शिवाय झोपलात तर ही समस्याही दूर होण्यास मदत होईल.

- Advertisement -

झोपची गुणवत्ता सुधारेल

उशी शिवाय झोपल्याने आपण नैसर्गिकरित्या स्थिर राहतो. मान,पाठ नैसर्गिकरित्या समान राहून आपल्याला आराम मिळतो. त्यामुळे आपली झोपण्याची गुणवत्ता देखिल वाढते.

तणाव कमी होतो

उशी शिवाय झोपल्याने आपल्याला शरीराला नैसर्गिकरित्या आराम मिळतो. मान आणि पाठीचा त्रास कमी होतो. त्यामुळे ताण तणाव कमी होण्यास मदत होते.


हेही वाचा – World Meditation Day: एकाग्रता वाढविण्यासाठी सोप्या टिप्स

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -