घरताज्या घडामोडीWeight Loss Tips: दररोज व्यायम करुन वजन कमी होत नाहीये? तर...

Weight Loss Tips: दररोज व्यायम करुन वजन कमी होत नाहीये? तर फॉलो करा ‘या’ महत्त्वाच्या टिप्स

Subscribe

दररोज व्यायाम आणि डाएट फॉलो करण्यासोबतच आपल्या लाइफस्टाइलमध्ये देखील बदल करणे महत्त्वाचे

लॉकडाऊनच्या काळात अनेक लोक घरी असल्याने वजन वाढण्याच्या समस्या अनेकांना सतावत आहेत. वाढलेले वजन कमी करण्यासाठी लोक प्रयत्न करत आहेत. रोज व्यायाम करणे, डाइट करणे यांसारखे असंख्य प्रकार लोक रोज करताना दिसतात. मात्र तरीही त्यांचे वजन कमी होत नाही. अनेक दिवस नियमित व्यायाम आणि डाएट फॉलो करुन देखील लोकांचे वजन कमी होत नाही त्यामुळे लोक आणखी ताणावात येतात आणि तणावामुळे बऱ्याचदा आणखी वजन वाढते. वजन कमी करण्यासाठी दररोज व्यायाम आणि डाएट फॉलो करण्यासोबतच आपल्या लाइफस्टाइलमध्ये देखील बदल करणे महत्त्वाचे आहे. काही बेसिक टिप्स फॉलो करणे महत्त्वाचे आहे जेणेकरुन तुम्ही हेल्दी रहाल आणि तुमचे वजन देखील कमी होण्यास मदत होईल.

वजन कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स 

  • सकाळी नाश्ता करा. बऱ्याच जणांचा असा भ्रम असतो की सकाळी नाश्ता न केल्यास वजन कमी होईल. मात्र याने वजन आणखी वाढते. नाश्ता न केल्याने दुपारच्या जेवणावेळी जास्त भुक लागते.
  • दररोज योग्य झोप घेणे महत्त्वाचे आहे. झोप पूर्ण न झाल्यास शरीरातील मेटाबॉलिजम चांगल्या प्रकारे काम करत नाही. ज्यामुळे शरीरातील एक्स्ट्रा फॅट्स बर्न होत नाहीत आणि वजन वाढत जाते.
  • जेवणात गव्हाच्या पदार्थांचा समावेश करा. गव्हामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात. त्याचप्रमाणे गव्हाच्या पदार्थामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते. त्यामुळे वजन कंट्रोल होण्यास मदत होते.
  • बऱ्याच जणांना सोडा, कोल्ड्रिंग सारखे पेय पिण्याची सवय असते. वजन कमी करण्यासाठी ही पेय पिणे बंद करा. या पेयांमुळे वजन वाढण्यास मदत होते. या पेयांएवजी नारळ पाणी प्या ते आरोग्यासाठी चांगले ठरेल.
  • खाण्याच्या क्वानिंटीटवर लक्ष द्या. दररोज एका ठराविक प्रमाणात जेवण करा. त्याचप्रमाणे संध्याकाळी ८ नंतर शक्यतो जेवण करु नका.
  • वजन कमी करण्यासाठी रात्री खूप वेळ जागणे कमी करा. रात्री जागल्याने वजन वाढण्यास मदत होते. रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याने भूक देखील लागते. रात्री भूक लागल्याने अनेक जणांना स्नॅक्स खाण्याची सवय असते त्याने वजन वाढते. त्यामुळे ही सवय बदलणे महत्त्वाचे आहे.
  • वजन कमी करायचे असल्यास दररोज जास्तीत जास्त चालण्याचा प्रयत्न करा. आजकाल बऱ्याच ऑफिसमध्ये लिफ्ट किंवा एक्सलेटर असतात. ऑफिसमध्ये लिफ्ट किंवा एक्सलेटरने जाण्याएवजी चालत जाण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे फोन बोलताना देखील बसून बोलण्याऐवजी चालत चालत फोनवर बोला म्हणजे तुमचे चालणे होईल.

    हेही वाचा – Covid19 च्या उपचारांसाठी काळे जिरे फायदेशीर, तज्ञांची माहिती

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -