घरट्रेंडिंगफाटक्या जॅकेची किंमत ऐकून व्हाल थक्क! नेटिझन्सने ब्रँडची उडवली थट्टा

फाटक्या जॅकेची किंमत ऐकून व्हाल थक्क! नेटिझन्सने ब्रँडची उडवली थट्टा

Subscribe

सध्या कोणतीही फॅशन अवघ्या काही क्षणात फेमस होते तर काही फॅशनची थट्टा उडवल्याने ती सतत चर्चेत येत असते. पॅरिसमधील लक्झरी फॅशन हाऊस बालेंसियागा (Balenciaga) जगभर प्रसिद्ध आहे. मोठे सेलिब्रिटी या ब्रँडचे कपडे घालतात आणि त्यांना पसंती देतात. आपली स्टाईल स्टेटमेंट वाढवण्यासाठी, सेलिब्रिटींसह काही लोकं बालेंसियागा येथून कपडे, शूज आणि बॅगच्या नवीन डिझाईन्सची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र सध्या बालेंसियागा त्यांच्या ताज्या ऑफरमुळे, सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होताना दिसत आहे. Balenciaga ने अशे एक हुडी जॅकेट तयार केले आहे, सध्या ते चांगलेच चर्चेच आहे. या जॅकेटला भरपूर छिद्र असून ते फाटलेल्या अवस्थेतच विकले जात आहे. मात्र या हुडी जॅकेटची किंमत जर तुम्ही ऐकली तर तुम्हा देखील धक्का बसेल. या हूडी जॅकेटची किंमत 1,350 पाऊंड म्हणजे 1 लाख 39 हजार 163 रुपये इतकी आहे. ब्रँडच्या या ऑफरवर सोशल मीडियावर बरीच टीका होत आहे. पूर्णतः पॉलिस्टर तयार केलेले, या निळ्या आणि लाल रंगाच्या जॅकेटला पुढच्या बाजूस, हातावर, पाठीवर आणि खालच्या बाजूस बरेच छिद्र आहेत.

- Advertisement -

सोशल मीडियावर या फाटक्या हुडीची जोरदार चर्चा होत असून नेटिझन्स कंपनीची चांगलीच थट्टा उडवतांना दिसताय. एका ट्विटर युजरने या जॅकेटचा फोटो शेअर करताना लिहिले, ‘फक्त १ लाख ३९  हजार रुपयांमध्ये तुम्ही असे दिसू शकतात की तुमचे कपडे कुत्र्याने फाडले आहेत. त्याच वेळी, दुसऱ्या युजर्सने या जॅकेट्सची तुलना एका बिन बॅगशी केल्याचे दिसते. कंपनीने या जॅकेटसह असे डिस्क्रिप्शन लिहिले की, ‘बालेंसियागा कपड्यांसह वेगवेगळे प्रयोग करण्यास कधीही घाबरत नाही. आत घातलेले कपडे या जॅकेटमध्ये बनवलेल्या छिद्रातून स्पष्ट दिसू शकतात. जीन्स, हेम शर्ट आणि फॅडेड कॅप्समध्ये मोठे छिद्र हे या ब्रँडचे वैशिष्ट्य असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.

Balenciaga बद्दल…

Balenciaga ची स्थापना स्पेनमध्ये क्रिस्टोबल बालेंसियागा यांनी केली. क्रिस्टोबलला ‘द किंग ऑफ फॅशन’ म्हणून ओळखले जाते. प्रसिद्ध फ्रेंच फॅशन डिझायनर ख्रिश्चन डायरने त्याला जगातील मास्टर म्हणून परिभाषित केले. हा ब्रँड आधीच त्याच्या अनोख्या फॅशनबद्दल चर्चेत आहे. गेल्या वर्षी, या ब्रँडच्या अनोख्या इंस्टाग्राम पोस्टसंदर्भात खूपच थट्टा उडवली गेली होती, ज्यामध्ये कुत्र्याला मोठी हूडी घातल्यानंतर त्याच्याकडून मॉडिलींग करून घेण्यात आले होते. दुसरीकडे, झंपर परिधान केलेल्या मॉडेलने तिच्या चेहऱ्यावर सपाट आणि विषम आकाराचे फिल्टर लावून ब्रँडचा प्रचार केला.


खेलरत्न पुरस्कार आता ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ म्हणून ओळखला जाणार; पंतप्रधान मोदींची घोषणा
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -