घरCORONA UPDATECovid-19 : फुफ्फुसावर हल्ला करणाऱ्या कोरोना विषाणूपासून बचावासाठी, काय काळजी घ्याल?

Covid-19 : फुफ्फुसावर हल्ला करणाऱ्या कोरोना विषाणूपासून बचावासाठी, काय काळजी घ्याल?

Subscribe

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने जगभरात हैदौस घालता आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना अनेक नियम आणि उपाय सांगितले जात आहे. वास्तविक कोरोना विषाणू नाक, तोंड आणि डोळे यांच्या मदतीने आपल्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो आणि ऑक्सिजन प्रक्रियेस अडथळा आणतो. दरम्यान २५ टक्के लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे नसली तरी त्यांचा फुफ्फुसांवर कोरोनाने हल्ला केलेला असतो. परंतु काही घरगुती उपचार करुन आणि योग्यवेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपण आपल्या फुफ्फुसाची काळजी घेऊ शकतो. आपल्या फुफ्फुसांना कोरोनापासून काही घरगुती उपायांच्या माध्यमातू दूर ठेवू शकतो.

‘या’ घरगुती उपचारांचा अवलंब करा

१) दिवसातून किमान तीन ते चार वेळा गरम पाण्याची वाफ घ्या. या पाण्यात ओवा आणि आणि कापूर टाकल्यास अधिकच उत्तम.

- Advertisement -

२) तसेच कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळूनही पिऊ शकतात. जर लिंबू नसेल तर नुसते गरम पाण्याचे सेवन करुनही फुफ्फुसांना संक्रमणापासून वाचवू शकता.

३) थंड पाण्याचे सेवन करणे टाळा. फळांमध्ये संत्री, सफरचंद आणि नारळपाणी प्या.

- Advertisement -

अशी ‘घ्या’ फुफ्फुसांची काळजी

१) सकाळी उठल्यावर गरम पाण्याचा गुळण्या करा.

२) पायांसह, शरारीची हालचाल होण्यासाठी जिने चढा- उतरा.

३) फुगा फुगवण्यासारखा व्यायाम करा.

४) २० सेकंद ते ६० सेकंदापर्यंत श्वास थांबवा. असे तीन वेळा करा.

फुफ्फुसांना संसर्ग झाल्यास कसे ओळखाल?

१) जर श्वास घेण्यात अडचण येत असेल तर मग समजून जा की कोरोना विषाणू फुफ्फुसांना संक्रमित करीत आहे.

२) जर फुफ्फुसांच्या खालच्या भागात सूज किंवा तीव्र वेदना होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

३) कोरडा खोकला, विशेषत: छातीत दुखणे देखील कोरोनाचे लक्षण आहे.

आपल्याला लक्षणे दिसल्यास काय करावे-

१) प्रथम घाबरू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या.

२) आपल्या फुफ्फुसांचे सीटी स्कॅन करा.

३) दर अर्ध्या तासाने ऑक्सिमीटरने ऑक्सिजनची पातळी तपासा.

४) कुटुंबातील इतर सदस्यांपासून अंतर ठेवा. स्वतःला कोणाचाही संपर्कात येणार नाही याची काळजी घ्या.

५) उपाशी पोटी राहू नका. रिकामी पोटी असलेल्या व्यक्तीचा शरीरात विषाणू अधिक प्रभाव करतो.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -