घरलाईफस्टाईलअभ्यासाचे तंत्र विकसित करा

अभ्यासाचे तंत्र विकसित करा

Subscribe

दहावी, बारावी तसेच पदवी परीक्षेत जास्त गुण मिळवण्यासाठी मुले घोकंपट्टी करतात. पण प्रत्यक्षात नोकरीच्या शोधात असताना किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करताना घोकंपट्टी केलेले विस्मरणात जाऊन, अपुर्‍या ज्ञानामुळे आपल्याला अपयश येते. त्यामुळे विशिष्ट तंत्राचा अवलंब करून नियोजनपूर्वक अभ्यास करूया. जेणेकरून परीक्षेत जास्त गुण सुद्धा मिळतील आणि पुढील आयुष्यात यशस्वी होण्यासाठी या ज्ञानाचा उपयोग होईल.

वर्गात शिकविण्यात येणार्‍या पाठाचे वाचन करून जावे. त्यामुळे शिक्षक काय शिकवितात हे समजण्यास सोपे होईल. पाठाचे शिकवून होताच शिक्षकांशी संवाद साधून शंकांचे निरसन करून घ्यावे.

लक्षात ठेवा जेवढे अधिक प्रश्न, शंका तुम्ही शिक्षकांशी संवाद साधून सोडवून घेणार तेवढेच अभ्यास करताना तुम्हाला अधिक सोपे होईल. महत्त्वाच्या मुद्यांची स्वतःच टिपण काढा.

- Advertisement -

अभ्यास करताना स्वतःची टिपण उपयोगात येतील. सर्वात महत्त्वाचे, प्रश्नपत्रिकेचा सराव करताना प्रश्न-उत्तरे लिहून काढावीत. लिहिल्याने दीर्घकाळ स्मरणात राहते.

परीक्षेला जाताना स्वतः तयार केलेली टिपण वाचावीत. अभ्यासाचे वेळापत्रक तयार करावे. तसेच कठीण वाटणार्‍या विषयाला अधिक वेळ द्यावा. सर्वात महत्त्वाचे घोकंपट्टी करणे टाळावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -