घरलाईफस्टाईललिची खाल्ल्यामुळे एन्सेफलायटिस होतो का?

लिची खाल्ल्यामुळे एन्सेफलायटिस होतो का?

Subscribe

एन्सेफलायटिस (चमकी ताप) आजारात मेंदूला सूज येते

एन्सेफलायटिस (चमकी ताप) आजारात मेंदूला सूज येते. बिहार येथील मुझफ्फरनगरमध्ये एन्सेफलायटिसच्या अनेक बळींच्या शरीरात साखरेचे प्रमाण कमी आढळून आले. या आजारामुळे १६४ मुलांचा मृत्यू झाला. लिची हे फळ खाल्ल्यामुळे एन्सेफलायटिस हा आजार होतो असा अनेकांचा गैरसमज आहे. अॅक्युट एन्सेफलायटिस सिन्ड्रोमचा परिणाम केंद्रीय चेता यंत्रणेवर मुख्यतः मुलांच्या आणि किशोरवयीन मुलांच्या केंद्रीय चेता यंत्रणेवर होतो. हा विषाणूमुळे होणारा आजार असून ताप, आकडी येणे आणि डोकेदुखी अशी सौम्य फ्ल्यूसारखी लक्षणे दिसून येतात. हा आजार मुख्यत्वे लिची पिकणाऱ्या भागांमध्ये झाला आहे. या रोगाचा फैलाव होण्यामागे लिचीचे सेवन हासुद्धा एक घटक असल्याचे निष्पन्न झाले आहे.

- Advertisement -

लिची फळात क जीवनसत्व, बी२ जीवनसत्व (रिबोफ्लेव्हिन), पोटॅशिअम आणि तांबे मुबलक प्रमाणात असते. त्यात अँटिऑक्सिडंट्स, अँटि-कॅन्सर, अँटि-इन्फ्लेमेटरी (दाहरोधक), अँटि-मायक्रोबिअल, अँटि-व्हायरल (विषाणूविरोधी) गुणधर्म असतात. त्याचप्रमाणे हे फळ अँटि-डायबेटिक, अँटि-ओबेसिटी, यकृत संरक्षक आणि प्रतिकारकशक्ती वाढविणारे आहे. त्याचप्रमाणे या फळामध्ये प्रोअॅन्थोसिअॅनिडिन्ससह पॉलिफेनॉल्स (वनस्पतीवर आधारित अँटिऑक्सिडंट्स) मुबलक प्रमाणात असते. गंभीर हृदयविकार आणि कर्करोग होण्याला हा घटक प्रतिबंध करतो.

लिची खाल्ल्यामुळे एन्सेफलायटिस होतो?

रात्री उपाशी पोटी झोपणे, आर्द्रतेमुळे होणारे डिहायड्रेशन आणि रिकाम्या पोटी खाल्लेली लिची ही एन्सिफलायटिस होण्यामागची कारणे आहेत. बराच काळ शरीरात अन्न न गेल्यामुळे पहाटे शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झालेले असते. पुरेसे पोषण न मिळालेली जी मुले काही न खाता रात्री झोपतात त्यांच्यात हायपोग्लायसेमिया (जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अत्यंत कमी म्हणजेच ४एमएमओएल/एल इतके होते तेव्हा निर्माण होणारी स्थिती) होतो. मेंदूला शरीरातील ग्लुकोजची पातळी सामान्य असण्याची आवश्यकता असते. यकृत ही गरज पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे ग्लुकोज सिन्थेसिस हा त्याला पर्याय असतो. पुरेसे पोषण असलेल्या मुलांवर लिची काही परिणाम करू शकत नाही. केवळ पुरेसे पोषण नसलेल्या ज्या मुलांनी आधीच्या दिवशी लिची खाल्ली असेल आणि रिकाम्या पोटी झोपी गेली असतील, त्यांच्यावर लिचीचा परिणाम होतो.

- Advertisement -

पुरेसे पोषण असलेल्या मुलांमध्ये राखीव ग्लुकोज यकृतामध्ये ग्लायकोजेनच्या रूपात (ग्लुकोज पॉलिसॅकराइड) साठवले जाते. त्यामुळे जेव्हा ग्लुकोजची पातळी खालावते तेव्हा ग्लायकोजेनचे ग्लुकोजमध्ये विघटन होते आणि ते वापरासाठी रक्तामध्ये सोडले जाते. पण पुरेसे पोषण नसलेल्या मुलांमध्ये (गरीब घरातील मुले) ग्लुकोजमध्ये रुपांतरीत होण्यासाठी ग्लायकोजेनचा साठा पुरेसा नसतो. त्यामुळे पुरेसे पोषण नसलेल्या मुलांमधील नैसर्गिक यंत्रणा रक्तातील ग्लुकोजची पातळी योग्य राखू शकत नाही. परिणामी, हायपोग्लायसेमिया होतो.

जेव्हा एखाद्याच्या यकृतामधील ग्लायकोजेनचा साठा संपतो किंवा अपुरा असतो तेव्हा शरीर फॅटी अॅसिड (नॉन-कार्बोहायड्रेट उर्जा स्रोत) ग्लुकोजमध्ये रुपांतरीत करू लागते. पण लिचीमधील रसायनामुळे फॅटी अॅसिडचे ग्लुकोजमधील रुपांतरण मध्येच अडवले जाते आणि ग्लुकोजची निर्मिती होत नाही. परिणामी, त्या व्यक्तीच्या शरीरातील ग्लुकोजच्या पातळीची झीज भरून काढली जात नाही.

(डॉ. प्रदीप गाडगे, आघाडीचे मधुमेहतज्ज्ञ, गाडगे डायबेटिस सेंटर)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -