घरलाईफस्टाईलतुमच्याही घरात आहे झुरळ? काळजी सोडा

तुमच्याही घरात आहे झुरळ? काळजी सोडा

Subscribe

घरात खूप अडचण झाली किंवा घाण झाली का झुरळी होतात. झुरळी होणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र, खाद्यपदार्थांवर झुरळ जाण्याची भीती सर्वांनाच असते. त्यामुळे कोलेरो, अतिसार असे अनेक आजार उद्भवू शकतात. हे रोग टाळण्यासाठी आपण आपल्या घरातील झुरळे बाहेर घालवणे गरजेचे आहे, म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत झुरळ घालवण्यासाठी काही घरगुती उपाय.

झुरळे घालवण्यासाठी पुदीन्याचे तेल एक रामबाण उपाय आहे. याकरता पुदीना तेल हे नैसर्गिक कीटकनाशक आहे, यासाठी पुदीना तेल आणि पाण्याचे मिश्रण असलेला एक स्प्रे बनवू शकता.

- Advertisement -

बाजारात उपलब्ध असलेल्या कीटकनाशक फवारण्यांच्या तुलनेत हा स्प्रे आपल्या आरोग्यास हानिकारक नाही आणि तो मुले आणि जनावरांसाठी सुरक्षित आहे. आपण या स्प्रेचा वापर कारमधील झुरळांना मारण्यासाठी देखील करु शकता.

एका भांड्यात समान प्रमाणात बेकिंग पावडर आणि साखर मिसळा. त्यानंतर त्यात पाणी घाला. आता हे मिश्रण झुरळ असलेल्या ठिकाणी शिंपडा. साखरेचा गोडपणा झुरळांना आकर्षित करेल आणि बेकिंग पावडर झुरळांना घराबाहेर पळवून लावू शकते.

- Advertisement -

झुरळ लसूण, कांदा आणि मिरपूडच्या वासापासून दूर पळतात. या मिश्रणामध्ये मिरपूड झुरळ नष्ट करण्यास मदत करते. हा नैसर्गिक उपाय आपल्या घरातील झुरळ दूर करु शकतो.

बोरिक पावडर घरातील काही जागांवर टाकल्यास झुरळं घरातून पळ काढतात. पण, ही पावडर टाकताना काळजी घेणे गरजेचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -