घरलाईफस्टाईलपाठीच्या मणक्याचे विकार दूर करण्यासाठी करा 'गोमुखासन'

पाठीच्या मणक्याचे विकार दूर करण्यासाठी करा ‘गोमुखासन’

Subscribe

जाणून घ्या ''गोमुखासन'चे फायदे.

आपण अनेकदा वेगवेगळी आसने पाहिली आहेत. मात्र, कोणते आसन कोणत्या आजारावर फायदेशीर असते. याबाबत माहिती नसते. तसेच सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सातत्याने पाठीचे त्रास उद्भवत असतात. जर तुम्हाला पाठीच्या मणक्याचा सातत्याने त्रास जाणवत असेल, तर तुम्ही ‘गोमुखासन’ नक्की करु शकता. चला तर जाणून घेऊया ते कसे करावे? त्याचे फायदे काय?

‘गोमुखासन’ म्हणजे काय?

- Advertisement -

संस्कृतमध्ये गो म्हणजे ‘गाय’ आणि मुख म्हणजे ‘तोंड.’ या आसनात शरीराचा आकार गायीच्या मुखाप्रमाणे दिसतो. म्हणून या आसनाला ‘गोमुखासन’ म्हणतात.

‘गोमुखासन’ कसे करावे?

- Advertisement -

प्रथम खाली बसून दोन्ही पाय सरळ ताठ ठेवावेत. पाठ ताठ असावी. डावा पाय मागील बाजूस वाकवून, डाव्या टाचेच्या नितंबाच्या डाव्या बाजूखाली ठेवा. नंतर उजवा पाय अशा प्रकारे वाकवा की, उजवा गुडघा डाव्या गुडघ्यावर येईल आणि उजव्या पायाचा तळवा डाव्या मांडीखाली येईल. आता डावा हात कोपऱ्याशी वाकवून वरती डोक्याकडे घ्यावा आणि मानेखाली खांद्यामध्ये टेकवावा. उजवा हात कोपराशी वाकवून मागील बाजूने वर घ्यावा. तसेच डाव्या हाताचे पहिले आणि दुसरे बोट आणि उजव्या हाताचे पहिले आणि दुसरे बोट एकमेकांत गुंतवा. सुरुवातीस जमणार नाही; पण प्रयत्न करा. शरीराचा वरील भाग आणि डोके एका सरळ रेषेत ठेवावे. या आसनात दहा-पंधरा सेकंद राहावे.

‘गोमुखासन’ केल्याने काय होतात फायदे?

  • ‘गोमुखासन’ आसनामुळे पायाचा संधिवात बरा होण्यास मदत होते. तसेच मूळव्याधीची तक्रार देखील दूर होते.
  • या आसनामुळे फुप्फुसाची आणि हृदयाची शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच हे आसन आरोग्यासाठी खूपच उपयोगी आहे.
  • या आसनामुळे हातासह खांद्याला खूप चांगल्या प्रकारे स्ट्रेच मिळतो तसेच खांद्याचे असलेले दुखणे देखील कमी होते.
  • त्याचप्रमाणे हाडे बळकट होतात आणि पाठीचे दुखणे बरे होते.
  • ज्या व्यक्तींच्या शरीरावर कोड येतात त्यांनी हे आसन करावे. त्याचा चांगला फायदा होतो.
  • ‘गोमुखासन’ केल्याने थकवा, टेन्शन, चिंता, काळजी, अस्वस्थता दूर होण्यास मदत होते.
  • पायांनाही चांगला व्यायाम मिळतो.
  • पाठीचा, सायटिका आणि संधिवात यासाठी हे आसन खूप फायदेशीर असून खांदा तसेच मानेवरील स्टीफनेस दूर होतो.
  • त्याचप्रमाणे या आसनाच्या सरावाने ताकद मिळते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -