घरलाईफस्टाईलचमचमीत हरबर्‍याची भाजी

चमचमीत हरबर्‍याची भाजी

Subscribe

हरबऱ्याची भाजी रेसिपी

आपण अनेक भाज्या करतो. पण, काही भाज्या आपल्याला हव्या तशा झणझणीत होत नाही. त्यामुळे आज आपण चमचमीत अशी हरबऱ्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत.

साहित्य

- Advertisement -
  • हरबर्‍याच्याची भाजी
  • दाळीचे पीठ
  • तेल
  • मोहरी
  • जिरे
  • लसणाच्या पाकळ्या
  • वाळलेली मिरची
  • हिंग
  • हळद
  • बेसन
  • तिखट
  • मीठ
  • पाणी

    कृती

सर्वप्रथम एक मोठे भांडे घ्या. त्यात तीन मोठे चमचे तेल टाका. तेल गरम झाले की त्यात मोहरी, जिरे, फोडणीचा कडकडाट झाला की त्यात दहा बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून टाका. वाळलेली मिरची टाका, चवीला चिमूटभर हिंग आणि हळद टाका. लसूण थोडा परतला की कढईत दोन ते तीन ग्लास पाणी टाका. त्यानंतर त्या पाण्याला उकळी आली की दोन वाटी हरबर्‍याची भाजी घेऊन त्यात पाऊण वाटी हरबर्‍याच्या दाळीचे पीठ मिसळा. नंतर थोडे तिखट, मीठ, जास्त तिखट हवे असल्यास थोडा काळा मसाला टाका. हे सगळे एकत्र मिसळून घ्या. तोपर्यंत कढईतल्या पाण्याला छान उकळी आलेली असेल. आता त्या पाण्यात थोडे थोडे करीत मिसळलेली भाजी टाका. एका हाताने भाजी टाकायची आणि दुसर्‍या हाताने कढईत ती हलवत रहायची. भाजी चांगली गरम झाली की काढून ठेवा. या गरम भाजीवर मस्त लसणाची फोडणी टाकायची आणि तीळ लावलेल्या गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत खा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -