घरलाईफस्टाईलऐकावं ते नवलच! 'हेलिकॉप्टर भेळ' तुम्हीसुद्धा खाल्लीय का?

ऐकावं ते नवलच! ‘हेलिकॉप्टर भेळ’ तुम्हीसुद्धा खाल्लीय का?

Subscribe

'हेलिकॉप्टर भेळ' सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी आपण 'डिस्को भजी' बद्दल जाणून घेतलं होतं. 'डिस्को भजी' नंतर आता 'हेलिकॉप्ट भेळ' व्हायरल होतं आहे.

खवय्ये मंडळी नेहमीच वेगवेगळ्या चटपटीत पदार्थांच्या शोधात असतात. त्यांना नेहमीच खाण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन हवे असतात. भेळ हा असाच एक चाटचा प्रकार आहे जो अनेकांना आवडतो. भेळचे सुद्धा अनेक प्रकार असतात. त्यातलाच “हेलिकॉप्टर भेळ'(helicopter bhel) हा नवीन आणि भन्नाट भेळचा प्रकार खवय्यांच्या भेटीला आला आहे. ‘हेलिकॉप्टर भेळ’ हे नाव ऐकून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटलं असेल ना? भेळ हा असा पदार्थ आहे. जो कमी पैशात पोटभर खाता येतो. ‘हेलिकॉप्टर भेळ’ सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी आपण ‘डिस्को भजी’ बद्दल जाणून घेतलं होतं. ‘डिस्को भजी’ नंतर आता ‘हेलिकॉप्ट भेळ’ व्हायरल होतं आहे.

हे ही वाचा – पुण्यातील ‘डिस्को’ भजी नेमकी आहे तरी कशी? कृतीसह जाणून घ्या

- Advertisement -

सध्या सोशल ‘हेलिकॉप्टर भेळ'(helicopter bhel)चा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती भेळ बनविताना दिसते आहे. पण त्या व्यक्तीचा भेळ बनविण्याचा अंदाज खूपच वेगळा आहे. भेळ बनविण्याचा हा आगळा वेगळा अंदाज तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. आपण नेहमी जी भेळ खातो त्यापेक्षा ही भेळ नक्कीच वगेळी आहे. असं त्या व्हिडीओ मध्ये दिसत आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – नाश्ता किंवा लंच ऐवजी ‘ब्रंच’ करण्याचा नवा ऑप्शन किती फायदेशीर ? जाणून घ्या

या व्हिडिओमध्ये भेळ बनविणारी व्यक्ती सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हेलिकॉप्टरच्या पंख्याप्रमाणे ही व्यक्ती भेळ जोरात फिरवते आणि काहीच क्षणात भेळ खवय्यांसमोर तयार. भेळ बनविण्याच्या पध्द्तीवरूनच याला ‘हेलिकॉप्टर भेळ'(helicopter bhel) असे नाव पडले. या व्हिडिओवर खाद्यप्रेमींच्या भन्नाट प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत. या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात खाद्य प्रेमींकडून लाईक्स आणि व्ह्यूज येत आहेत.

हे ही वाचा – कॉफी आणि व्यक्तिमत्त्व, काय आहे नातं? जाणून घ्या…

 

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -