घरलाईफस्टाईलकडुलिंबाच्या पानांचे करा दररोज सेवन

कडुलिंबाच्या पानांचे करा दररोज सेवन

Subscribe

जाणून घेऊया दररोज कडुलिंबाच्या पानांचे सेवन करण्याचे फायदे.

बऱ्याचदा आपल्या घराच्या अंगणात असलेल्या तुळशीचे पान आपण तोंडात टाकतो. तर काही लोक दररोज न चुकता तुळशीच्या पानांचे सेवन देखील करतात. त्याचप्रमाणे जर तुम्ही कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्यास त्याही तुम्हाला चांगलाच फायदा होईल. चला तर जाणून घेऊया दररोज कडुलिंबाच्या पानांचे सेवन करण्याचे फायदे.

आंघोळ करताना करा वापर

दररोज आंघोळ करताना कडुलिंबाची पाने गरम पाण्यात घालून त्या पाण्याने आंघोळ करा. यामुळे जंतूचा नाश होण्यास मदत होते.

- Advertisement -

कफ, खोकला झाल्यास

एखाद्या व्यक्तीस कफ किंवा खोकला नियंत्रित करण्यासाठी कडुलिंबाचा वापर करु शकता. कारण श्वसन विकारांवर कडुलिंब दीर्घकाळापर्यंत आराम देतो.

- Advertisement -

शर्करा नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयोग

तुमच्या शरीरातील शर्करा नियंत्रणात ठेवण्यासाठी कडुलिंबाचा उपयोग होतो. यामुळे मधुमेहाचा त्रास देखील कमी होतो.

गॅस, बद्धकोष्ठतेचा त्रास

गॅस आणि बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर कडुलिंब त्यापासून सुटका करुन देण्यासाठी मदत करतो.

घाम येत असल्यास

हातापायाला खूप घाम येत असेल तर कडुलिंबाचे तेल लावल्यास त्याचा फायदा होतो.

दातांचे आजार

कडुलिंबाच्या फुलांचा काढा करुन प्यायल्यास दातांचे आजार दूर होतात.

तोंडावरील सुरकुत्या

तोंडावर सुरकुत्या येत असतील तर आपण कडुलिंबाची पाने खाणे फायदेशीर ठरते. अन्यथा तुम्ही कडुलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून आपल्या चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.


हेही वाचा – कोमट पाणी पिण्याचे शरीरावर होतात ‘हे’ फायदे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -