घरलाईफस्टाईलअशी करा डासांपासून सुटका

अशी करा डासांपासून सुटका

Subscribe

हे उपाय केल्यास डासांपासून होईल सुटका

कोणत्याही ऋतूमध्ये डास हे घरात येत असतात. मात्र या डासांना घरातून बाहेर काढणे कठीण असते. परंतु काही घरगुती उपायांचा वापर केल्यास घरातून डास बाहेर काढणे अधिक सोपे जाते.

  • घरातून डासांना घालवण्यासाठी वापरले जाणारे लिक्विड रिफीलमध्ये लिंबाचा रस टाकून ते वापरु शकता. यामुळे घरात डास येत नाहीत आणि आलेले डास मरण्यास मदत होते.
  • निलगिरीच्या तेलात लिंबाचा रस मिक्स करुन स्प्रेच्या बॉटलमध्ये ठेऊन त्यांने घरात स्प्रे केल्याने डास घरात शिरकाव करत नाहीत.
  • लवंगाच्या तेलाच्या वासाने मच्छर मरतात. हे तेल तयार करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलात लवंगाच्या तेलाचं मिश्रण करुन ते अंगावर लावा. यामुळे मच्छर चावणार नाहीत.
  • डास जाण्यासाठी कापूर हा एक रामबाण उपाय आहे. घरात डास येत असल्यास घराच्या कोपऱ्यात कापूर पेटवून ठेवा. कापराच्या सुगंधाने डास घरात येत नाहीत.
  • कडुलिंबाचे तेलही लिक्विड रिफीलमध्ये घालून वापरु शकता. यामुळे डासांचा प्रादुर्भाव कमी होतो.
  • झेंडूचे फुल डासांवर एक चांगला उपाय आहे. झेंडूच्या फुलांच्या वासाने डास दूर जातात. घरात तुळशीच्या झाडासोबत झेंडूचे झाड लावल्यास उत्तम
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -