घरलाईफस्टाईलमुलांचे आरोग्य कसे जपावे?

मुलांचे आरोग्य कसे जपावे?

Subscribe

मुलांसाठीच्या हृदयाचे आरोग्य जपण्यासाठीच्या काही चांगल्या सवयींची आवश्यकता असते. मात्र, त्यासाठी खबरदारी घेणे गरजेचे असते.

मुलांसाठीच्या हृदयाचे आरोग्य जपण्यासाठीच्या काही चांगल्या सवयींची आवश्यकता असते. मात्र, जीवनशैलीतील हे बदल संपूर्ण कुटुंबाने स्वीकारले तरच ते यशस्वी होऊ शकतात हे लक्षात ठेवायला हवे. याचे साधेसे कारण म्हणजे, ‘मुले तुमच्या सांगण्यावरून नव्हे तर तुम्ही कसे वागता हे पाहूनच कसे वागायचे हे ठरवत असतात‘. अलीकडच्या काळात लोकांमध्ये आरोग्याविषयीची जागरुकता वाढताना दिसत आहे. प्रत्येक जण जिमसाठी वेळ काढत आहे किंवा विशिष्ट डाएट पाळण्याच्या प्रयत्नात आहे. पण हे करत असताना आवर्जून लक्षात ठेवण्याची आणखी एक गोष्ट म्हणजे हृदय निरोगी ठेवण्यासाठीच्या चांगल्या सवयी या लहानपणापासूनच लागायला हव्यात. यासाठी खबरदारी घेणे देखील गरजेचे असते.

भोजनाव्यतिरिक्तचे पदार्थ खाणे टाळाव


पाकिटबंद पदार्थांचे प्रमाण मर्यादित ठेवा आणि घरात फळे आणि सुकामेवा मुलांच्या सहज हाताशी लागेल अशा ठिकाणी ठेवा. भाजलेले चणेशेंगदाणे हा जातायेता तोंडात टाकण्यासाठीच्या पदार्थांचा चांगला पर्याय आहे.

- Advertisement -

व्यायाम

मुलांमध्ये लठ्ठपणा आणि त्यातून कॉलेस्ट्रोल, हायपरटेन्शन, मधुमेह, मुलींच्या बाबतीत पाळी लवकर येणे आणि पॉलिसिस्टिक ओव्हरीज यांसारख्या समस्या वाढताना दिसत आहेत. या सगळ्यासाठी मैदानी खेळांचा अभाव हे दुसरे महत्त्वाचे कारण आहे, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये. मुले जर आपल्या पालकांना चालण्याचा किंवा जॉगिंगचा व्यायाम करताना पाहतील तर त्यांनाही ही सवय लावून घ्यावीशी वाटेल. मुले तुम्हाला जीममध्ये व्यायाम करताना पाहत नाहीत हे लक्षात घ्या. वाढत्या वयामध्ये व्यायामासाठी वेळ नाहीअसे म्हणणाऱ्या मुलांनाच व्यायामाची गरज सर्वाधिक असते! दर संध्याकाळी घराबाहेर खेळणे मुलांच्या वेळापत्रकाचा भाग बनवा.

मुलांना फुटबॉल, क्रिकेट सारखे मैदानी खेळ, जिम्नॅस्टिक्स, स्केटिंग, बॅडमिंटन, नृत्य, मार्शल आर्टस् इत्यादी गोष्टींमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहन द्या. वयाने थोड्या मोठ्या असलेल्या मुलांसाठी रोजचे चालणे, जॉगिंग किंवा सायकलिंग या सवयी चांगल्या आहेत. तर रविवारच्या दिनक्रमामध्ये संपूर्ण कुटुंबाचा समावेश असेल अशी एखादी गोष्ट करता येईल. मॉलमध्ये फिरण्याऐवजी जवळच्याच एखाद्या उद्यानामध्ये फिरायला गेल्यास वेळ जास्त सत्कारणी लागेल.

- Advertisement -

इंटरनेट वापराच्या वेळेवर मर्यादा हवी

इंटरनेट सर्फिंग किंवा गेमिंग किंवा टीव्ही पाहण्यावर खर्च होणारा वेळ मर्यादित ठेवा. या गोष्टींमधून वाचलेला वेळ बाहेर खेळण्यामध्ये गुंतवता येईल. आपल्या २ वर्षांच्या बाळाला आयपॅड वापरता येतो याची शेखी मिरवणाऱ्या पालकांना पाहून आपोआपच कपाळाला आठ्या येतात. आपली डिव्हायसेस पासवर्डने सुरक्षित केल्यावर लहान मुले ती वापरणार नाहीत. मोठ्या वयाच्या मुलांच्या बाबतीत मात्र, हे आव्हान थोडे कठीण आहे. कारण त्यांना शाळेचे उपक्रम, गृहपाठ इत्यादी गोष्टींसाठी इंटरनेट वापरावा लागतो. ही परिस्थिती हाताळण्यासाठी इंटरनेट वापरावर वेळेची मर्यादा घालण्याचा उपाय करता येईल.

झोप आणि तणावमुक्ती

मुलांना भरपूर आणि शांत झोप मिळणे अत्यावश्यक आहे. ९ तासांची गाढ झोप गरजेची आहे. दर दिवशी मुलांना काही मोकळा स्वैरवेळ मिळेल, याची काळजी घ्या. तसेच आपल्याला ताण जाणवत आहे हे कसे ओळखायचे. हा ताण कसा हाताळायचा याचे शिक्षण मुलांना देणेही तितकेच महत्वाचे आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -