घरलाईफस्टाईलपाणी वाचवण्याचे पाच सोपे उपाय

पाणी वाचवण्याचे पाच सोपे उपाय

Subscribe

 

मुंबई असं शहर आहे जिथे बऱ्याच ठिकाणी २४ तास पाणी आणि वीज यांचा पुरवठा होत असतो. पण बऱ्याच लोकांना पाण्याचा अपव्यय करायची सवय असते. मुंबई शहराचे नागरिकीकरण झपाट्याने वाढत असल्यामुळे पाण्याची कमतरता आगामी काळात भासू शकते. लहरी पाऊस, अतिशय जुन्या झालेल्या आणि नेहमी फुटणाऱ्या जलवाहिका यामुळं पाण्याचा तुटवडा नेहमीच भासतो. पाणी यंदा उशीरा पाऊस पडला तर पाणी कपात होऊ शकते. अशावेळी पाणी कसे वाचवू शकतो याचे पाच सोपे उपाय.

- Advertisement -

१) तोंड धुत असताना अथवा ब्रश करत असताना पाण्याचा नळ वाहता ठेऊ नये. नळातून पाणी गळत असेल तर वेळेवर त्याची दुरुस्ती करून घ्यायला हवी. शॉवर आणि फ्लशचा अवास्तव वापर टाळल्यास पाण्याची बचत होऊ शकते. तसेच पाणी येतं म्हणून आंघोळीसाठी आवश्यक असेल तितकाच वापर करा.

२) भाजी धुत असताना जवळपास लीटरभर पाणी आपण वापरतो. त्यामुळे भाजी धुत असताना खाली भांडं ठेवावे. ते पाणी नंतर झाडांना घालण्यासाठी वापरता येते. अथवा बाथरूम धुण्यासाठी साबण लावताना या पाण्याचा वापर करता येऊ शकतो.

- Advertisement -

३) बाटलीत प्यायला भरलेले पाणी हे कधीही शिळे होत नसते. त्यामुळे अर्धवट राहिले असेल तर ते फेकून देऊ नका. त्या पाण्याचा वापर कुकरमध्ये अथवा तांदूळ, डाळ धुण्यासाठी होऊ शकतो. आपल्याला हे पाणी प्यायचे नसल्यास, लादी पुसण्यासाठी, भांडी धुण्यासाठी अथवा आपली वाहनं धुण्यासाठीदेखील याचा उपयोग होऊ शकतो.

४) सोसायटीमध्ये पाणी साठवणुकीच्या टाक्या स्वच्छ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. त्याऐवजी हवेच्या प्रेशरवर टाकी चांगल्या पद्धतीने स्वच्छ करता येऊ शकतात. त्यामध्ये हवा जास्त व पाण्याचे प्रमाण कमी असते. यासाठी मशीनचा वापर करता येऊ शकतो.

५) कपडे भिजत घातलेल्या पाण्याचा वापर खरवडलेल्या भांडी धुण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे साबण आणि पाणी दोन्हीची बचत होते. उरलेले पाणी घरातील भिंती अथवा लादी पुसण्यासाठी उपयोग करता येऊ शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -