घरलाईफस्टाईलअशी वाढवा रोगप्रतिकारक शक्ती

अशी वाढवा रोगप्रतिकारक शक्ती

Subscribe

रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतील या टीप्स

सध्याच्या बदलत्या तापमानामुळे सर्दी, खोकला, ताप अशा अनेक समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे अशा दिवसात आपली रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवली पाहिजे. याच्या काही टीप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी antioxidant, व्हिटॅमिन आणि मिनरलयुक्त पदार्थांचा सामावेश करायला हवा.
  • नियमित आपल्या आहारात फळे, पालेभाज्या आणि ड्रायफ्रुट्सचा समावेश करायला हवा.
  • रोज सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध घालून घेतल्याने अनेक आजारांपासून आपले रक्षण होते.
  • आपल्या आहारात गाजर, रताळी आणि बीट याचे सेवन करावे. यामुळे आजार दूर राहण्यास मदत होते आणि प्रतिकारशक्ती देखील वाढते.
  • रावस, बांगडा सारख्या माशांमध्ये ओमेगा थ्री फेटी acidचे प्रमाण अधिक असल्याने अशा माशांचा आपल्या आहारात समावेश करावा, यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल.
  • भाज्यांचे सूप, आले, तुळशीचा चहा यांचा आपल्या आहारात समावेश करायला हवा. त्यासोबतच कांदा, हळद, लसूण यांचा समावेश आहारात केल्याने संसर्गाचे प्रमाण कमी होते.
  • आपली पचनशक्ती वाढवण्यासाठी प्रोबायोटिक पदार्थांचा समावेश करायला हवा.
  • दररोज दही, इडली, डोसा यांचा समावेश आपल्या आहारात करावा. रोज अर्धी वाटी दही खाल्ल्याने पचनशक्ती वाढून पचनासंबंधीत आजार बरे होतात.
  • दिवसभरात जास्तीत जास्त गरम पाणी प्यावे. पाण्यात लिंबाचे तुकडे टाकून ठेवलेले पाणी प्यायल्याने अशक्यतपणा कमी होतो.
  • सकाळी हवेमध्ये धूळ आणि प्रदूषणाचे प्रमाण अधिक असल्याने थोडे उशिरा चालायला जावे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -