महिंद्राची स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक कार येणार; फिचर्स आणि डिझाईन एकदम आकर्षक

महिंद्रानेही इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. महिंद्रा इलेक्ट्रिकने ट्रेओ ऑटो, ट्रेओ डिलिव्हरी व्हॅन, ट्रेओ टिपर व्हेरिअंट आणि ई-अल्फा मिनी टीपर बाजारात आणण्याची तयारी केली आहे.

इंधन दरात वाढ होत असल्याने सामान्य नागरिकांना खासगी गाड्या वापरणे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicle) मागणी वाढू लागली आहे. ग्राहकांकडून इलेक्ट्रिक वाहनांची विचारणा होत असल्याने अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहने बाजारात उपलब्ध करून देत आहेत. त्यातच, महिंद्रानेही इलेक्ट्रिक वाहने बाजारात (Mahindra Electric vehicle) आणण्याचा निर्णय घेतला आहे. महिंद्रा इलेक्ट्रिकने ट्रेओ ऑटो (Mahindra Electric Trio Auto), ट्रेओ डिलिव्हरी व्हॅन (Delivery Van), ट्रेओ टिपर व्हेरिअंट आणि ई-अल्फा मिनी टीपर बाजारात आणण्याची तयारी केली आहे.

के१, के२, के३ आणि के४ अशा चार व्हेरियंटमध्ये महिंद्रा एटम लॉन्च (Mahindra Atom EV) करण्यात येणार आहे. ७.४ किलोव्हॅट बॅटरी पॅकसह यातील दोन व्हेरियंट लॉन्च होणार आहेत. के१ आणि के३ च्या बेस व्हेरियंटमध्ये एसीची सुविधा मिळणार आहे तर, के२ आणि के४ च्या व्हेरियंटमध्ये एसी असणार आहे. भारतीय बाजारात एटम क्वाड्रिसायकल लवकरच लॉन्च होणार असल्याचे समोर आलं आहे.

हेही वाचा – Electric scooter fire : इलेक्ट्रिक स्कूटर आग घटना रोखण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; नव्या लाँचिंगवर बंदी

काय आहेत फिचर?

महिंद्रा एटम क्लीन एनर्जी (Mahindra Atom Clean Energy) ही इलेक्ट्रिक कार आरामदायक आणि स्मार्ट फिचर्सने सज्ज आहे. तसेच, महिंद्रा इलेक्ट्रिक अल्फा टिपरसुद्धा सादर केली आहे. ज्यामध्ये ई-अल्फा मिनी प्लॅटफॉर्म असणार आहे. या ई-अल्फा मिनी टीपरमध्ये १.५ किलोव्हॅट बॅटरी पॅक देण्यात आला असून सिंगल चार्जवर ८० किमीच्या रेंजने ही गाडी पळेल. तसेच, ३१० किलो या गाडीची लोडिंग क्षमता आहे. तात्पुरत्या स्वरुपात ही गाडी व्यवसायिक वाहनाच्या श्रेणीत लॉन्च करण्यात आली आहे. वैयक्तिक वापरासाठी ही गाडी केव्हा लॉन्च होणार याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

महिंद्रा एटम ही गाडी दिसायला आकर्षक आणि अत्याधुनिक सुविधांनी सज्ज आहे. तसेच, या गाडीची किंमतही अत्यंत किफायतशीर आहे. ही गाडी अवघ्या तीन लाखांपासून असेल अशी माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक स्पीड ५० किमी प्रतितास असणार असून संपूर्ण चार्जसाठी ५ तासांचा कालावधी लागणार आहे. एटम इलेक्ट्रिक क्वाड्रिसायकल सिंगल चार्जमध्ये १२० किमीची रेंज देईल असा दावाही कंपनीने केला आहे.