घरलाईफस्टाईलतुम्ही आंबा आणि टरबूज फ्रीजमध्ये ठेवताय? ठेवत असाल तर वेळीच व्हा सावध

तुम्ही आंबा आणि टरबूज फ्रीजमध्ये ठेवताय? ठेवत असाल तर वेळीच व्हा सावध

Subscribe

प्रत्येक ऋतूनुसार वेगवेगळे पदार्थ, भाजा, फळे आपण फ्रीजमध्ये स्टोर करतो. विशेषत: उन्हाळ्यात गरमीपासून वाचण्यासाठी अनेक पदार्थ आपण फ्रीजमध्ये साठवतो. अनेकांना वाटते एखादा पदार्थ, फळं, बाहेर राहिल्यास सडून खराब होईल त्यापेक्षा तो फ्रीजमध्ये बराच काळ सुरक्षित राहिल. परंतु सर्वच भाज्या, फळे, पदार्थ, फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज असते ? तर नाही. कारण प्रत्येक ऋतुनूसार एखादे फळ, भाजी फ्रीजबाहेर राहिल्यानंतरही बराचं काळ टिकू शकते. यावर तज्ज्ञांकडूनही सांगितले जाते की, एखादी गोष्ट फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याची चव बदलते आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावरही होतो.

विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसांत आंबा आणि टरबूज या फळांचे सर्वाधिक सेवन केले जाते. परंतु ही दोन्ही फळे फ्रीजमध्ये ठेवू नयेत असे तज्ज्ञांनकडून सांगितले जात आहे. पण ही फळे फ्रीजमध्ये ठेवू नयेत असे सांगण्यामागचे कारण काय आहेत? किंवा याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो जाणून घेऊ या…

- Advertisement -

प्रसिद्ध डायटिशियन आणि ‘दि बाइटिंग ट्रुथ’चे संस्थापक एँलेक्स पार्कर सांगतात की, आंबा आणि टरबूज या फळांना फ्रीजबाहेर ठेवावे. कारण ही फळं कमी तापमानात लवकर खराब होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे कापलेला आंबा आणि टरबूज अजिबात फ्रीजमध्ये ठेवू नका.

तरबूज विशेषत: इथिलीनच्या प्रति अधिक संवेदनशील आहे. हा एक हार्मोन असून जो फळं आणि भाज्यांना अधिक पिकण्यासाठी उत्सर्जित करतो. हा हार्मोन इतर फळं आणि भाज्यांच्या गुणवत्तेवरही परिणाम करतो. त्यामुळे स्वयंपाक घरातील ही फळं इतर खाद्यपदार्थांपासून दूर ठेवली पाहिजेत.

- Advertisement -

यावर युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ एग्रीकल्चर (USDA) च्या एकाअहवालानुसार, टरबूज, खरबुज आणि आंबा या फळांना घरातील (रुम टेंप्रेचर) तापमानात ठेवणे फायदेशीर आहे. कारण या फळांमधील अँटी-ऑक्सीडेक्ट्स हे चांगले असते. ज्याचा आपल्या शरीरास देखील फायदा होतो.

फळांचा रंग आणि चव- उन्हाळ्यात अनेक जण बाजारातून आंबे आणि टरबूज आणून ते धुवून सरळ फ्रीजमध्ये ठेवतात. परंतु असे केल्याने फळांची चव खराब होते. त्यामुळे काही वेळासाठी ही फळे तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची झाल्यास ती चुकूनही कापू नका. कारण याने फळाचा रंग आणि चव दोन्हीही बदलते.

आंब्याचे फायदे –

आंबा या फळात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळते. जे रक्तवाहिन्या आणि हेल्दी कोलेजनच्या विकासासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. कारण व्हिटॅमिन सी शरारीवरील जखमा लवकर बरे करण्यास मदत करते. याशिवाय आंबा आपल्या शरीराला बऱ्याच मोठ्या आजारांपासून वाचव करतो. आंब्याच्या पिवळ्या आणि केशरी भागात मोठ्याप्रमाणात बीटा कॅरोटीन आढळते. आंब्यात आढळणाऱ्या अनेक अँटी ऑक्सीडेंट्समधील बीटा कॅरेटीन एक आहे. शरीरातील अँटी ऑक्सीडेंट्स कर्करोगाच्या वाढीस जबाबदार मानल्या जाणार्‍या शरीरातील फ्री रेडिकल्सशी लढतात.

टरबूजचे फायदे –

टरबूजमध्ये असलेल्या लाइकोपीन आणि अनेक प्रकारचे प्लांट कंपाउंडमध्ये कर्करोगाविरूद्ध लढण्याचे गुणधर्म आढळतात.


7th Central Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता ‘ही’ रक्कम मिळणार दुप्पट, सरकारने वाढवली मर्यादा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -