घरमहाराष्ट्रनाशिक‘बॉश’नंतर एक्सेल कंपनीत ७३ हजारांची साहित्य चोरी

‘बॉश’नंतर एक्सेल कंपनीत ७३ हजारांची साहित्य चोरी

Subscribe

कंपनीतील साहित्य चोरी करण्यासाठी नाशिकमध्ये कामगारांचीच टोळी सक्रिय असल्याची दाट शक्यता

देशभर उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या असलेल्या नाशिकमधील बॉश कंपनी साडेआठ लाख रूपयांच्या मालाच्या चोरीची घटना ताजी असतानाच एक्सेल इंजिनिअरींग कंपनीत ७३ हजार रुपयांचे साहित्य कामगारांनी चोरल्याचे समोर आले आहे. चोरीप्रकरणी पोलिसांनी एका कामगारास अटक केली आहे.

या घटनेमुळे उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कंपनीतील साहित्य चोरी करण्यासाठी नाशिकमध्ये कामगारांचीच टोळी सक्रिय असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी अविनाश खैरनार यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, पोलिसांनी राहुल संजय सूर्यवंशी (वय २८, सातपुर) असे अटक केलेल्या संशयित कामगाराचे नाव आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल सूर्यवंशी एक्सेल इंजिनिअरींग या कंपनीत कार्यरत आहेत. त्यांनी ११ जून रोजी ७३ हजार रूपये किंमतीचे चांदीचे तीन ऍनोड चोरून नेले. पोलीस तपासात स्पेअर पार्ट्स कोणाला विक्री केले. कोणी पार्ट्स खरेदी केले, याची चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तींचे धाबे दणाणले आहेत. पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे करत आहेत.

दोन कामगारांसह आणखी तिघांना अटक; बॉश स्पेअर पाटर्र्सची चोरीप्रकरण

सातपूर औद्योगिक वसाहतीतील बॉश कंपनीतील स्पेअर पाटर्र्स चोरी प्रकरणात सातपूर पोलिसांनी मंगळवारी (दि.१५) आणखी तीन व्यक्तींना अटक केली. तिघांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

- Advertisement -

आता या गुन्ह्यात अटक केलेल्यांची संख्या पाच झाली आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी राजकीय व्यक्तींची चौकशी सुरु केली आहे. त्यामुळे उद्योग व राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. संजय अशोक रोकडे (३०, रा. लोकमान्य नगर, सिडको, नाशिक), कमलेश सुरेश पिरमले (वय ३५, रा. अशोकनगर, सातपूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

सप्टेंबर 2020 ते 12 जून 2021 या कालावधीत कंपनीतील संशयित कामगारांनी चहा-नाष्टा पुरविण्यास येणार्‍या ट्रॉलीचालकाशी संगनमत करुन ट्रॉलीच्या खालच्या भागात थोडे-थोडे स्पेअरपार्ट हलवले. हे स्पेअर पार्ट ट्रॉली चालकाने संबंधित लॉकरमध्ये ठेवला.

चोरीचे पाटर्र्सची घनकचरा वाहून नेण्यासाठी येणार्‍या अ‍ॅपेचालकाशी संगनमत करून करुन कचर्‍याखाली स्पेअर पाटर्र्स लपवून कंपनीबाहेर नेले. अशा पद्धतीने एकूण 8 लाख 38 हजार 553 रूपयांचे महागडे स्पेअर पाटर्र्सची चोरुन नेले समोर आले आहे. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी गुन्हा नोंदवत पाच जणांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम राठोड करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -