घरलाईफस्टाईलमसाला शेंगदाणे

मसाला शेंगदाणे

Subscribe

मसाला शेंगदाणा रेसिपी

लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकाला शेंगदाणे हे आवडतातच. मग त्यात जर मसाला शेंगदाणे असतील तर अति उत्तम. चला तर पाहुया कसे बनवायचे मसाला शेंगदाणे.

साहित्य

  • १ चमचा बेसन
  • चिमूटभर हळद
  • लाल तिखट
  • गरम मसाला पावडर
  • धणे पावडर
  • हिंग
  • सोडा (चिमूटभर)
  • चाट मसाला

कृती

एका बाउलमध्ये शेंगदाणे घ्या त्यात शेंगदाणे बुडेल एवढे पाणी घाला. लगेच बाहेर काढून वरील साहित्यात शेंगदाणे घालून मिक्स करा. आता यात चवीनुसार मीठ आणि तेल (अंदाजाने १-२ चमचे) घालून सर्व मिक्स करा. वरुन किंचित पाणी घाला म्हणजे मसाला सर्व शेंगदाण्यांना व्यवस्थित लागेल. त्यानंतर मायक्रोसेफ प्लेटमध्ये काढून मायक्रो मोड वर ६-८ मिनिटे रोस्ट करून घ्या. (मायक्रोवेव नसेल तर तेलात डिप फ्राय करून घ्यावे.) नंतर शेंगदाणे बाहेर काढून थंड करा आणि डब्यात भरून ठेवा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -