घरलाईफस्टाईलनॅचरल्स आइस्क्रीम

नॅचरल्स आइस्क्रीम

Subscribe

घरच्या घरी नॅचरल्स आइस्क्रीम कसे बनवायचे?

सध्या उन्हाचे चटके जाणू लागले आहे. त्यामुळे थंडगार आइस्क्रीम खाण्याकडे बरेच जण वळले आहेत. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी घरच्या घरी नॅचरल्स आइस्क्रीम कसे बनवायचे ते दाखवणार आहोत.

साहित्य

- Advertisement -

दुध – १ वाटी
साय किंवा फ्रेश क्रिम – १ वाटी
दुध पावडर १ वाटी
आवडत्या फळाचा गर किंवा पल्प – १ वाटीसाखर – चवीनुसार

कृती

- Advertisement -

दुध, साय, दुध पावडर, आणि फळाचा गर सर्व जिन्नस मिक्सरमध्ये एकत्र करुन फिरवुन घ्यावे. हे मिश्रण साधारण इडलीच्या मिश्रणासारखे सरबरीत असावे. (जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही) झालेल्या मिश्रणाची चव घेऊन बघावी आणि आवश्यकता वाटल्यास त्यात साखर घालावी. नंतर तयार मिश्रण भांड्यात काढुन डीप फ्रिजमध्ये सेट होण्यास ठेवावे. फ्रिजचे कुलींग थोडे वाढवावे. साधारणतः दुपारी सेट करायला ठेवल्यास रात्रीच्या जेवणानंतर खाता येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -