घरलाईफस्टाईल#WorldIdliDay :असा झाला 'इडली'चा जन्‍म!

#WorldIdliDay :असा झाला ‘इडली’चा जन्‍म!

Subscribe

पाक शास्त्राचा अभ्‍यास करणार्‍यांच्‍या मते ८०० ते १२०० इसवी पूर्वमध्‍ये इडली भारतात आली. 'इडली' शब्‍दाची निर्मिती 'इडलीग' या शब्दापासून झाली होती. याचा उल्‍लेख 'कन्‍नड' साहित्‍यात सापडतो.

जगभरात कोणालाही विचारले इडली हा पदार्थ आवडतो का तर आपसुकच प्रत्येकाच्या तोंडून हो असेच उत्तर मिळेल. ज्याप्रमाणे मुंबईत वडा-पाव या पदार्थास जितकी मागणी आहे तेवढीच मागणी इडली-चटणी किंवा इडली-सांबारला देखील आहे. सर्व सामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या इडलीचा आजचा विशेष दिवस आहे. ३० मार्च रोजी जागतिक इडली दिवस म्हणून साजरा केला जातो. जाणून घेऊया याच आवडणाऱ्या इडली विषयी….

- Advertisement -

असा झाला ‘इडली’चा जन्‍म 

सकाळच्या वेळात वेगवेगळ्या ठिकाणी, नाक्यावर हे इडलीवाले इडली विकत उभे असतात. या इडलीवाल्यांकडील चटणी, सांबारची एक वेगळीच चव असते. तसेच त्यांच्याकडे असणाऱ्या डाळवडा, मेदू वडा यांच्याकडे चवीने खाल्ला जातो. इडली सांबार, इडली चटणी सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. इडली म्हटलं की, अप्रत्‍यक्षपणे साऊथचे म्‍हणजे दक्षिण भारताचा पदार्थ आहे असे बोलले जाते. मात्र तसे पाहता ही इडलीचा भारतात येण्याचा प्रवास इंडोनेशियातून झाला आहे. इडलीला खूप जूना इतिहास आहे. पाक शास्त्राचा अभ्‍यास करणार्‍यांच्‍या मते ८०० ते १२०० इसवी पूर्वमध्‍ये इडली भारतात आली. ‘इडली’ शब्‍दाची निर्मिती ‘इडलीग’ या शब्दापासून झाली होती. याचा उल्‍लेख ‘कन्‍नड’ साहित्‍यात सापडतो.

- Advertisement -

‘इडली’ दिनाची शुरुआत

जागतिक इडली दिन मागच्‍या ३ वर्षापासून साजरा केला जात आहे. या दिवसाची सुरुवात ‘एम एनियावन’ यांनी केली. एम एनियावन हे ‘मल्लीपू इडली’चे संस्‍थापक आहेत. थोरांपासून ते लहानांच्‍यापर्यंत इडली सर्वांसाठी सुरक्षित खाद्य आहे. एनियावन यांच्‍या मते, फादर डे, मदर डे असे डेस आपण साजरे करतो त्‍याचप्रमाणे मला वाटले की, इडली डे देखील साजरा करायला हवा.

idli

भारताची लाडकी इडली

हा मूळ भारताच्या दक्षिणेकडील प्रदेशातून आलेला आणि संपूर्ण भारतभर लोकप्रिय झालेला तांदळाचा एक खाद्यपदार्थ आहे. तांदूळ आणि उडदाची डाळ, किंवा तत्सम पदार्थ आंबवून आणि वाटून झालेल्या घट्टसर पीठाची गोल आकार असलेली वाफेवर उकडून इडली बनवली जाते. इडली बरोबर सांबार आणि ओल्या खोबऱ्याची चटणी खाल्या जातात. आंबवल्यामुळे इडलीची चव किंचित आंबट असते. दक्षिणी भारतात इडली भरपूर प्रमाणात खाल्ली जाते. महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही इडली नाष्ट्यासाठी बनवली जाते. हल्‍ली झटपट तयार होणारी रव्‍याची इडली देखील बनवली जाते.

ये इडली Testy हैं!

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -