घरलाईफस्टाईलस्कार्फच्या हटके स्टाईल

स्कार्फच्या हटके स्टाईल

Subscribe

हल्ली हिवाळ्यातच नव्हे तर, तरुणींच्या दैनंदिन कपडे परिधान करण्याच्या स्टाईलमध्ये स्कार्फ अगदी देखना लूक आपल्याला देऊन जातो. वर्षभर असे विविध स्टायलिश स्कार्फ तरुणींच्या गळ्याभोवती पाहायला मिळतात. त्या स्कार्फच्या काही हटक्या स्टाईल..

हिडन क्नॉट स्कार्फ –
या पद्धतीचा स्कार्फ वेस्टर्न टॉप असल्यास शक्यतो तरुणी वापरताना दिसतात. नावाप्रमाणे हा स्कार्फ बांधताना स्कार्फची क्नॉट लपवली जाते. त्यामुळे एक देखणा लूक तर मिळतोच; पण, ही स्टाईल वेगळी ठरते.

- Advertisement -

डबल ट्विस्टेड स्कार्फ-
वेस्टर्न टॉप किंवा कुर्ता असणार्‍या रंगास शोभेल असे दोन रंगांचे स्कार्फ घेऊन डबल ट्विस्टेड स्टाईल तुम्ही करू शकता. जो तुम्हाला हटके लूक सहज मिळवून देऊ शकतो.

साईड क्नॉट –
कोणत्याही ऋतूत साईड क्नॉट या स्कार्फच्या स्टाईलचा वापर करता येतो. साध्या टॉपला स्टायलिश लूक आणण्यासाठी साईड क्नॉट स्टाईलचा स्कार्फ तुम्ही ट्राय करू शकतात.

- Advertisement -

नेक बो स्कार्फ –
फिकट रंगाच्या फॉर्मल शर्टवर नेक बो स्टाईलचा स्कार्फ ट्राय केल्यास निराळा लूक तुम्हाला मिळेल. फॉर्मल्सवरही स्टाईल जरा हटके दिसण्यास मदत होईल.

हँगिंग स्टाईल –                                                                                                                 या प्रकारचा स्कार्फ तुम्ही टॉप किंवा वेस्टर्न शॉर्ट कुर्त्यांवर हँगिंग स्टाईलचा स्कार्फ वापरु शकतात. डीप नेक असणार्‍या टॉपकरिता डीप नेक कव्हर करण्साठी हँगिंग स्टाईल उत्तम पर्याय ठरू शकतो.

रोजचे ड्रेसिंग करताना या सर्व स्कार्फच्या हटके स्टाईलचा वापर तुम्ही नक्की करा. तुमच्या साध्या राहणीमानात एक वेगळा लूक तुम्हाला या विविध स्कार्फच्या स्टाईलमधून मिळण्यास मदत होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -