घरलाईफस्टाईलस्टायलिश, सुलेखनपर, ट्रेंडी छत्र्या!

स्टायलिश, सुलेखनपर, ट्रेंडी छत्र्या!

Subscribe

स्टायलिश, सुलेखनपर, ट्रेंडी छत्र्यांची फॅशन

बऱ्याच व्यक्तींना बाराही महिने स्टाइलिश राहायला आवडते. मात्र, पावसाळ्यात सगळीकडे चिखल आणि ओलावा असल्यामुळे फॅशन करणे तसे कठीणच असते. परंतु, नेहमी स्टाइलिश राहणारे त्यातही कल्पकता दाखवितात. ते नवनवीन काही तरी शोधत राहतात. पूर्वी पावसाळा आला की, जुन्या छत्र्या बाहेर काढल्या जायच्या आणि त्याच वापरल्या जायच्या. मात्र, आता तो जमाना कालबाह्य झाला आहे. कारण आता खास रेनी सीझनसाठी बाजारपेठा सजू लागल्या आहेत. तशी खास पावसाळ्यासाठी शॉपिंग होऊ लागली आहे.

पावसाळ्यात पूर्वी छत्री म्हटली की पुरुषासाठी काळ्या रंगाची तर महिलांकरता विविध रंग असलेली, असे समीकरण होते. मात्र, आता तस राहिले नसून फॅशनमध्ये छत्रीला देखील तितकेच महत्त्व दिले जाते. सध्या बाजारात निरनिराळे आकार आणि विविध रंगसंगतींमुळे छत्र्या अधिक आकर्षक झाल्या आहेत. त्याचबरोबर तरुणींसाठी झालरच्या छत्र्यांचा ट्रेंड आला आहे. तर विविध रंगाची आणि सहज पर्समध्ये बसणारी दोन तीन घड्या होणाऱ्या छत्रीला देखील अधिक मागणी आहे . तर पूर्वी आजोबांच्या काळातील काठीसारख्या लांब असणाऱ्या छत्र्यांना नाव मुरडली जायची. मात्र, आता पुन्हा एकदा या छत्र्यांना पसंती दिली जाते. आजकालची तरुण पिढी आजोबांच्या काळातील मोठमोठ्या छत्र्या आवडीने वापरताना दिसत आहेत. पावसापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी रंगीबेरंगी, लांब आणि घडीच्या अशा विविध छत्र्या बाजारात दाखल झाल्या असून त्यांना अधिक मागणी तर आहेच, मात्र, आता काही क्लपक कलावंतांनी छत्र्यांच्या कॅनव्हासवर छान चित्रे आणि सुलेखन काढण्यास सुरुवात केली आहे. या छत्र्या बाजारात अधिकच भाव खात आहेत.

- Advertisement -

सुलेखन म्हणजे सुंदर हस्ताक्षराची कला. मात्र, सुलेखन हे माणसाचे सामान्य हस्ताक्षर नसून एका विशिष्ट हेतूने प्रेरित सौंदर्यपूर्ण हस्ताक्षर या दृष्टिकोनातून त्याकडे पाहिले जाते. वाचनीयता हा अक्षरसौंदर्याचा प्राथमिक घटक आहे. या दृष्टीने अक्षरांच्या उंचीलांबीरुंदीप्रमाणे त्याची लेखणी केली जाते. सुवाच्य, सुस्पष्ट अक्षरलेखनाबरोबरच अक्षरांच्या सौंदर्यावर आणि सजावटीवर सुलेखनात जास्त भर दिला जातो. सुलेखनामागे प्रामुख्याने कलात्मक उद्दिष्टे आणि प्रेरणा असतात आणि दर्शकाला सौंदर्यानुभूती आणि उच्च प्रतीचा कलात्मक आनंद देण्याची भूमिका असते. त्यामुळे या छत्र्या आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तीला भेट म्हणून देखील दिल्या जातात.

सुलेखन असलेल्या छत्र्या या इतर छत्र्यांपेक्षा वेगळ्याच असतात. या छत्र्यांवर काढण्यात आलेले सुलेखन पावसाच्या पाण्याने निघून देखील जात नाही. तसेच बऱ्याचदा आपल्या जवळील प्रिय व्यक्तीला भेटवस्तू म्हणून या छत्र्या खरेदी केल्या जात असून सध्या बाजारात या छत्र्यांना अधिक मागणी आहे. प्रसाद मुंढे, सुलेखन कलाकार

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -