घरलाईफस्टाईलनववधू म्हणून सासरी माप ओलांडताना...

नववधू म्हणून सासरी माप ओलांडताना…

Subscribe

लग्नबंधनात अडकल्यानंतर माप ओलांडून नवीन घरात गृहप्रवेश करताना नव्या नवरीच्या मनात माहेराच्या प्रत्येक आठवणी डोळ्यासमोर असल्या तरी, इथून पुढे तिचं होणारं नवं घर याबाबत उत्सुकताही तेवढीच असते

मुलगी असणार्‍या प्रत्येक घरामध्ये मुलगी वयात आली, तिचे शिक्षण पूर्ण होत आले की, तिच्या लग्नाच्या चर्चा तिच्या घरात कमी आणि इतर नातेवाईकांमध्ये अधिक होताना दिसतात. त्यामुळे आई-वडील योग्य स्थळाची वाट पाहत असतात. काही घरांमध्ये असेही ऐकायला मिळते की, ‘मुलीचे लग्न झाले की आम्ही मोकळे’. प्रत्येक आईवडिलांना वाटत असते आपल्या मुलीला योग्य जोडीदार, चांगले मोकळे वातावरण असणारे घर मिळाले पाहिजे. ज्या घरात सासू सासरे नाही तर आपल्या मुलीला सांभाळून आणि समजून घेणारे आईवडीलच मिळावे.

- Advertisement -

लग्नबंधनात अडकल्यानंतर माप ओलांडून नवीन घरात गृहप्रवेश करताना नव्या नवरीच्या मनात माहेराच्या प्रत्येक आठवणी डोळ्यासमोर असल्या तरी, इथून पुढे तिचं होणारं नवं घर याबाबत उत्सुकताही तेवढीच असते. या नव्या घरात पाऊल टाकताना नवं घर, नवी नाती स्वीकारताना माहेरच्यांसोबत आता सासरच्या मंडळींच्या अपेक्षांचे थोडे दडपणही असते. नव्या घरात दमदार उखाण्यासह गृहप्रवेश तर होतो; पण नव्या घरातील प्रथा, चालीरीती, परंपरा, जीवनशैली या सार्‍यांशी जुळवून घेताना नववधूची जबाबदारी समजली जाते. मात्र ती नववधू आधुनिक काळाप्रमाणे, जीवनशैलीप्रमाणे जीवन जगलेली असली तर तिला काही घरांमध्ये असणार्‍या चालीरिती, पारंपरिकता रीतिरिवाजांची जपवणूक करताना मात्र चांगलीच दमछाक उडून या चालीरीतींचे नको तेवढे दडपण या नव्या मुलीवर तेवढेच असते.

लग्नाआधीच्या घरात बिनधास्त वावरणारे एक माहेरचे घर आणि दुसरं होणारं जबाबदारीचे घर म्हणजे सासर. या दोन्ही कुटुंबातील सकाळच्या दिवसाच्या सुरुवातीपासून ते रात्री दिवस संपेपर्यंत असणार्‍या दिनचर्येत बदल हा असतोच. त्यामुळे या सार्‍याशी जुळवून घेताना मुलीला सासरच्यांची मनं सांभाळून त्या घरात जुळवून घेणे महत्त्वाचे असते. अशावेळी कुटुंबियांनी सामंजस्याची भूमिका घेणं तितकेच गरजेचं असतं.

- Advertisement -

लग्न झाल्यानंतर अचानक नवं घर, नवी माणसं अवतीभवती असतात अशातच सासरच्या कुटुंबाशी जुळवून घेत असताना या नव्या मुलीला अर्थात नव्या सुनेला सोबत हवी असते ती म्हणजे विश्वासाने हात हातात दिलेल्या त्या आपल्या जोडीदाराची. सासरच्या कालपर्यंत अनोळखी, परक्या वाटणार्‍या माणसांबरोबर जे नाते जोडायचे आहे, ते जोडले जात असताना नवीन नवर्‍या मुलींप्रमाणे नवर्‍या मुलाची भूमिका तेवढीच महत्त्वाची असते. याकरिता घरात मोकळे वातावरण असेल तर उत्तमच. हे मोकळे वातावरण तिला या नव्या घरात मिळेल तसेच नवीन असताना तिची काही चूक झाली तर तिला सांभाळून घेतले जाईल, असे आत्मविश्वासाने सांगायला हवे. प्रसंगी घरच्यांशी संवाद साधणे हे आलेच. असे प्रयत्न मुलाने केले तर कमीत कमी वेळात नव्या घरातील नवे बदल स्वीकारणे तिला सहज शक्य होईल, हे मात्र नक्की.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -