मजल दरमजल पक्षबदल

Subscribe

…सायब मी तुमाला सांगू का?…आपन आता आपला हा पक्ष बदलून टाकुया…कार्यकर्त्याने डायरेक्ट मन की बात सांगून टाकली…
…तुझं म्हननं खरं हाये…आता या पक्षात काय राम उरलेला नाय…रामानंबी आपला सपोर्ट काढून घेतल्याला दिसतुय मला…नेत्याने आपलं मन कार्यकर्त्यापुढे खुलं केलं…
…आणि तसंबी यक्झिट पोलचे आकडेबी यांच्या बाजूने र्‍हायलेले न्हाइत…कार्यकर्त्याने नेत्याला दुजोरा दिला.
…अशा पक्षात राहून आपलं काय कल्याण होनार?…नेत्याने जरा ज्यादाच मन खुलं केलं.
…आणि जिथं तुमचं कायबी कल्याण होनार न्हाई तिथं माझंबी काय कल्याण होनार?…कार्यकर्त्यानेसुध्दा काही न लपवता नेत्याला सांगून टाकलं.
…मग आता आपण पक्ष बदललाच पायजेल…त्येच्याशिवाय आता काय दुसरा पर्याय मला दिसत नाय…नेत्याने एकदम फायनल बोलायला सुरुवात केली.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

एकापेक्षा एक असे अनेक पक्ष बदलल्यामुळे शेवटी एकच कार्यकर्ता उरलेला एक नेता कुठल्याशा गहन विचारात शून्यात नजर लावून बसला होता.
…समोर त्याचा एकुलता एक कार्यकर्ताही त्याच्या शुन्यातल्या नजरेकडे नजर लावून बसला होता…साहेबांच्या नजरेत काय आहे हे त्याने नजरेनं ताडलं होतं…
…कुणीकडं नजर लावून बसलाय सायब…नजरंला नवं काय घावलंय का?…कार्यकर्त्याने नेत्याला खूप मायेने विचारलं.
…आँ??…नेत्याची शून्यातली समाधी भंग पावली…
…न्हाय म्हनलं कवापातूर आसं शिरियसली बसनार हाय?…कार्यकर्त्याने पुन्हा काळजीने विचारलं.
…मी पन तोच शिरियसली इच्यार करतोय की आता या वक्ताला काय करावं?…नेता खरंच खूप सिरियस झाला.
…सायब मी तुमाला सांगू का?…आपन आता आपला हा पक्ष बदलून टाकुया…कार्यकर्त्याने डायरेक्ट मन की बात सांगून टाकली…
…तुझं म्हननं खरं हाये…आता या पक्षात काय राम उरलेला नाय…रामानंबी आपला सपोर्ट काढून घेतल्याला दिसतुय मला…नेत्याने आपलं मन कार्यकर्त्यापुढे खुलं केलं…
…आणि तसंबी यक्झिट पोलचे आकडेबी यांच्या बाजुने र्‍हायलेले न्हाइत…कार्यकर्त्याने नेत्याला दुजोरा दिला.
…अशा पक्षात राहून आपलं काय कल्याण होनार?…नेत्याने जरा ज्यादाच मन खुलं केलं.
…आणि जिथं तुमचं कायबी कल्याण होनार न्हाई तिथं माझंबी काय कल्याण होनार?…कार्यकर्त्यानेसुध्दा काही न लपवता नेत्याला सांगून टाकलं.
…मग आता आपण पक्ष बदललाच पायजेल…त्येच्याशिवाय आता काय दुसरा पर्याय मला दिसत नाय…नेत्याने एकदम फायनल बोलायला सुरुवात केली.
…पण आपल्याला चांगला फायद्याचा ठरल असा पक्ष बघा बुवा…कार्यकर्त्याने नेत्याला नम्र सूचना केली…
…माझा इतक्या वर्षांचा अनभव हाये की नारळ नीट वाजवून, हालवून बगितला तर त्यातनं ग्वाड पाणीबी मिळतं आणि वर खॉबरंबी मिळतं…नेत्याने चक्क नारळालाच हात घातला…
…बघा सायब, तुमचा अनभव जास्त आहे…आपण काय बोलनार…कार्यकर्त्याने कट्टर निष्ठा प्रकट केली…
…तसं नाय, पण कार्यकर्त्याचं मतबी नेत्यानं इचारात घेतलं पायजे न्हवं…नेत्याने थोडा उदारमतवाद दाखवला…
…आता तुम्ही आमचे नेते…आम्ही तुमचे कार्यकर्ते…आम्हाला कसलं आलं मत?…कार्यकर्त्याने पुन्हा एकदा आपली निष्ठा दाखवली…
…तसं नाय, तुलाबी मत म्हनून काय तरी असंल का नाय?…नेता भलताच लोकशाहीवादी झाला.
…तसं असल तर माझं मत आसं हाये की दुसरा पक्ष बदलताना त्येची आयड्यॉलॉजी आपल्याला पचली आणि परवडली पायजे असा पक्ष बघा…विचारलंच आहे म्हणून कार्यकर्त्याने आपलं मत मांडलं…
…का रं बाबा…एकदम आयड्यॉलॉजीवर आलास?…नेत्याने कार्यकर्त्याचं थेट अंतर्मनच जाणून घ्यायचा प्रयत्न केला…
…नाय, तसं नाय, हा आपला टोटल पाचवा पक्ष हाये…पण इश्टार्टिंगला आपण जवा आपला पयलाच वर्जिनल पक्ष बदलला तवा आपल्याला लई पॉब्लेम झाला…कार्यकर्त्याने आपल्या मनातली खदखद दबकत दबकत सांगितली…
…काय झालं तवा?…नेत्याने आणखी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
…तवा बरेच दिवस आपण सभेला चुकून आपल्या पयल्याच पक्षाचा झेंडा घिऊन जात हुतो आणि झिंदाबादबी पयल्याच पक्षाचा करत हुतो…कार्यकर्त्याने मर्मावरच बोट ठेवलं…
…खरं हाये तुझं…तवा त्या पक्षातले निष्ठावंत लोक आपल्याकडं बघून संशय घ्यायचे…त्या लोकास्नी वाटायचं की आपलं अजून पयल्या लोकांशी गॅटमॅट हाय…नेत्याला त्या फितूर दिवसांची आठवण झाली…
…मीडयामधल्या एका चाबरटानं तर तुमच्याबद्दल लिवलं हुतं की हा नेता आई म्हातारी झाली की आई बदलतू आणि बा म्हातारा झाला की बा बदलतू…कायकर्त्याने त्या फितूर दिवसांची आठवण आणखी गडद केली…
…म्हणूनच या येळंला आपण तसाच शॉलेड पक्ष बघितला पायजे…नेत्याने कार्यकर्त्याला नीट समजवलं…
…म्हणजे कसा?…कार्यकर्त्याने आ वासून विचारलं…
…म्हणजे जाताना आपला झिंदाबाद झाला पायजे…आणि येताना कुणी आपला मुर्दाबाद नाय केला पायजे…नेत्याने खुलासा करून सांगितलं.
…म्हणजेच जाताना आपली काठी घिऊन जायची…त्या काठीला त्येंचा झेंडा लावायचा…पण येताना त्येंचा झेंडा तिथंच ठिवून आपली काठी आपण परत आणायची…नुस्कान त्येंचंबी नाय आणि आपलंबी नाय…कार्यकर्त्याने खरी आयड्यॅलॉजी सांगितली…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -