घरमहा @२८८कलिना विधानसभा मतदारसंघ - म. क्र. १७५

कलिना विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १७५

Subscribe

कलिना (विधानसभा क्र. १७५) हा मुंबई उपनगरातला विधानसभा मतदारसंघ आहे.

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातला कलिना हा एक मतदारसंघ असून मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गीय मतदारांचं या मतदारसंघात अधिक प्रमाण आहे. हे मतदार मिश्र पार्श्वभूमीचे जरी असले, तरी उत्तर भारतीय मतदारांचं प्रमाण इथे अधिक आहे. मुंबई विद्यापीठ, मुंबई उच्च न्यायालय, अनेक ब्रिटिशकालीन शाळा याच मतदारसंघात येतात. या मतदारसंघात एकूण २२८ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १७५

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – १,४०,५५९
महिला – १,१२,४३५

- Advertisement -

एकूण मतदार – २,५२,९९४


Sanjay Potnis
संजय पोतनीस

विद्यमान आमदार – संजय पोतनीस, शिवसेना

२०१४मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून जाण्यापूर्वी संजय पोतनीस यांनी १९९७ ते २०१२ या कालखंडात मुंबई महानगर पालिकेमध्ये शिवसेनेचे नगरसेवक म्हणून काम केलं आहे. या कालखंडात पालिकेच्या वेगवेगळ्या समित्यांचे सदस्य आणि अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१४मध्ये भाजपच्या अमरजित सिंह यांच्यासमोर अवघ्या १३०० मतांनी निसटता विजय मिळवत पोतनीसांनी आमदारकी आपल्या नावावर केली. मुंबईचा नवोदित क्रिकेटपटू पृथ्वी शॉ प्रशिक्षणाच्या काळात संजय पोतनीस यांच्याकडेच राहात होता.


विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) संजय पोतनीस, शिवसेना – ३०,७१५
२) अमरजित सिंह, भाजप – २९,४१८
३) कृपाशंकर सिंह, काँग्रेस – २३,५९५
४) कॅप्टन मलिक, राष्ट्रवादी – १८,१४४
५) चंद्रकांत मोरे, मनसे – ११,७०८

नोटा – १७६६

मतदानाची टक्केवारी – ५०.१५ %


हेही वाचा – मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -