घरमहा @२८८पैठण विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ११०

पैठण विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ११०

Subscribe

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण (विधानसभा क्र. ११०) विधानसभा मतदारसंघ आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण हा विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. पैठण ही महाराष्ट्रातील पवित्र भूमी समजली जाते. संत एकनाथांची पैठण ही कर्मभूमी आहे. मराठवाड्यातील जायकवाडी हे मोठे धरण याच मतदारसंघात येते. मात्र तरिही पैठणमध्ये पिण्याच्या पाण्याची खूप मोठी समस्या आहे. उन्हाळ्यात पैठणमध्ये पाण्याची समस्या अधिक भीषण होते. धार्मिकदृष्ट्या पैठणचे महत्त्व असले तरी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांसाठी इथे चांगल्या सोयी-सुविधा नाहीत. पैठण मतदारसंघात मराठा मतदारांचे चांगलेच प्राबल्य आहे. त्यानंतर ओबीसी समाजाची संख्या आहे.

पैठण मतदारसंघावर शिवसेनेने खुप पूर्वीपासून आपली पकड ठेवलेली आहे. मात्र २००९ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय वाकचौरे यांनी इथे अनपेक्षितपणे विजय मिळवला होता. २०१४ साली संदिपान भुमरे यांच्यारुपाने पुन्हा एकदा शिवसेनेचा उमेदवार निवडून आला.

- Advertisement -

मतदारसंघ क्रमांक – ११०

मतदारसंघ आरक्षण – खुला

- Advertisement -

मतदारांची संख्या
पुरुष – १,४१,२१६
महिला – १,२०,९५१
एकूण मतदान – २,६२,१६७

विद्यमान आमदार – संदिपान भुमरे, शिवसेना

शिवसेनेचे आमदार संदिपान भुमरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थापासून राजकारणाची सुरुवात केली. १९९५ साली पैठण मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. १९९९ आणि २००४ मध्येही त्यांनी निवडणूक जिंकून हॅट्रटिक साधली होती. मात्र २००९ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय वाकचौरे यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा जोरात कमबॅक केले. संदिपान भुमरे यांनी पैठणमधील विहामांडवा येथील शरद कारखान्याच्या निवडणुकीत दणदणती विजच मिळवत साखर कारखाना आपल्या ताब्यात घेतला.

paithan mla sandipan bhumre
आमदार संदिपान भुमरे

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) संदिपान भुमरे, शिवसेना – ६६,९९१
२) संजय वाकचौरे, राष्ट्रवादी – ४१,९५२
३) विनायक हिवळे, भाजप – २९,९५७
४) रवींद्र काळे, काँग्रेस – २४,९५७
५) सुनील शिंदे, मनसे – ७०९१


हे वाचा – जालना लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -