अॅथलिट पालेंद्र चौधरीची गळफास लावून आत्महत्या

पालेंद्र चौधरी दिल्लीच्या नेहरु स्टेडिअममध्ये ट्रेनिंग घेत होता. पालेंद्र नोव्हेंबर २०१६ पासून नेहरु स्टेडिअममध्ये १०० मीटर आणि २०० मीटर शर्यतीचे प्रशिक्षण घेत होता.

indian sprinter palendra chaudhary
एथलीट पालेंद्र चौधरी

आतरराष्ट्रीय अॅथलिट पालेंद्र चौधरी याने दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु स्टेडिअममध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नेहरु स्टेडिअममधील अॅथलिट अकॅडमीमध्ये पालेंद्रने गळफास लावून आत्महत्या केली. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ वर्षाच्या अॅथलिट पालेंद्र चौधरीने हॉस्टेलच्या रुममध्ये पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

गळफास लावून गेली आत्महत्या

पालेंद्रने आत्महत्या केलीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पालेंद्रला त्यांनी नेहरू स्टेडियमच्या चिकित्सा केंद्रात दाखल केले. त्याठिकाणावरुन त्याला पुढील उपचारासाठी सफदरजंग येथे हालवण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान आज त्याचा मृत्यू झाला. स्पोर्टस अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, काल सकाळी पालेंद्र चौधरीचे त्याच्या वडीलांसोबत फोनवर काही कारणावरुन वाद झाला होता. त्यानंतर त्याची बहिण सुध्दा त्याच्याशी बोलण्यासाठी आली होती. मात्र आम्ही त्याला वाचवू शकले नाही.

वडिलांसोबत फोनवर झाले होते बोलणे

पालेंद्र चौधरीचे वडील महेश पाल यांनी सांगितले की, पालेंद्रचे त्यांच्याशी बोलणे झाले होते. त्याने वडिलांकडे पैशांची मागणी केली होती. त्यांनी त्याला पैसे देतो असे आश्वासन दिले होते. पालेंद्रच्या वडिलांनी सांगितले की, त्यानंतर काय झाले हे मला माहिती नाही. पालेंद्र चौधरी मुळचा अलीगढचा रहिवासी होता. दिल्लीच्या नेहरु स्टेडिअममध्ये तो ट्रेनिंग घेत होता. पालेंद्र नोव्हेंबर २०१६ पासून नेहरु स्टेडिअममध्ये १०० मीटर आणि २०० मीटर शर्यतीचे प्रशिक्षण घेत होता.