Friday, April 9, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र १० वी, १२ वीच्या परीक्षांबाबत शिक्षणमंत्र्यांची मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक

१० वी, १२ वीच्या परीक्षांबाबत शिक्षणमंत्र्यांची मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक

कडक निर्बंध लागू झाल्याने परीक्षा नेमक्या कशा घ्यायच्या यावर याबैठकीत चर्चा होणार

Related Story

- Advertisement -

दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत मंगळवारी एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. राज्यात वाढत्या कोरोनामुळे कडक निर्बंध लागू झाल्याने परीक्षा नेमक्या कशा घ्यायच्या यावर याबैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक विद्यार्थी दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईनच झाल्या पाहिजेत अशी मागणी करत आहेत. यातच राज्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे ५ एप्रिलपासून राज्यात कडक निर्बंध घोषित करण्यात आले. नव्या निर्बंधांमुळे दहावी, बारावीच्या परिक्षांबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळ उडाला आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार आहेत का? झाल्या तरी कशा त्या पद्धतीने होणार? किंवा झाल्या नाही तर विद्यार्थ्यांना गुण कसे देणार ? अशा अनेक बाबींवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड महत्त्वपूर्ण बैठक घेत आहेत.

- Advertisement -

या बैठकीत शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांसह चर्चा होणार आहे. त्याचप्रमाणे सीबीएससी आणि आयसीएससी बोर्डासह देखील चर्चा करावी लागणार आहे. त्यामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कारण या बैठकीतून दहावी, बारावीच्या परीक्षा होणार आहे किंवा नाहीत यावरील चित्र स्पष्ट होईल. दरम्यान शाळा, कॉलेज बंद असाताना परीक्षा कशा घेणार? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांकडून विचारला जात आहे.


 

- Advertisement -